मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांवर खंडणीप्रकरणी गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 16:31 IST2024-08-05T16:30:27+5:302024-08-05T16:31:01+5:30
रत्नागिरी : कंपनीतील आर्थिक व्यवहारातील अडचणींचा फायदा घेऊन मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी दमदाटी करून १ लाख २० हजारांची खंडणी घेतल्याचा ...

मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांवर खंडणीप्रकरणी गुन्हा
रत्नागिरी : कंपनीतील आर्थिक व्यवहारातील अडचणींचा फायदा घेऊन मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी दमदाटी करून १ लाख २० हजारांची खंडणी घेतल्याचा प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमाेल श्रीनाथ, साईश मयेकर आणि शेखर नलावडे (सर्व रा. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.
रत्नागिरी एमआयडीसी येथील एका कंपनीतील मालाची विक्री हाेत नसल्याने, तसेच कंपनीत काही लाेकांचे वेतन देणे बाकी आहे. या कंपनीतील काही लाेकांनी काम साेडून दिल्याने ही कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे. या अडचणींचा फायदा घेऊन मनसेच्या अमाेल श्रीनाथ, साईश मयेकर व शेखर नलावडे या तीन पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयात येऊन दमदाटी करून कंपनी बंद पाडण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अमाेल श्रीनाथ याने कंपनीतील एकाकडून एक लाख रुपये घेतले, तसेच कंपनीतील एका महिला गुंतवणूकदाराकडून दाेनवेळा प्रत्येकी दहा हजार असे एकूण १ लाख २० हजार रुपये जबरदस्ती करून खंडणी घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पाेलिसांनी तिघांवर भारतीय दंड विधान कायदा कलम ३८४, ३८५, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.