करंबेळेतील अपघातप्रकरणी तवेराचालकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:22 AM2021-07-16T04:22:24+5:302021-07-16T04:22:24+5:30

देवरुख : देवरुख-संगमेश्वर महामार्गावरील करंबेळे खाकेवाडी येथे मंगळवारी सकाळी तवेरा व खासगी आराम बस अपघातप्रकरणी तवेराचालकावर मंगळवारी रात्री देवरुख ...

A case has been registered against Taverachalak in Karambale accident case | करंबेळेतील अपघातप्रकरणी तवेराचालकावर गुन्हा दाखल

करंबेळेतील अपघातप्रकरणी तवेराचालकावर गुन्हा दाखल

Next

देवरुख : देवरुख-संगमेश्वर महामार्गावरील करंबेळे खाकेवाडी येथे मंगळवारी सकाळी तवेरा व खासगी आराम बस अपघातप्रकरणी तवेराचालकावर मंगळवारी रात्री देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद पोलीस नाईक संतोष सडकर यांनी दिली आहे. चेतन मोहन देवर्डे (२३, रा.अकोला, जि. बेळगाव, रा. कर्नाटक) हा आपल्या ताब्यातील तवेरा कार घेऊन देवरुखहून दापोलीच्या दिशेने जात होता, तर प्रगती खासगी आराम बस ही मुंबईहून देवरुख या दिशेने येत होती. अपघाताची खबर मिळताच देवरुख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चेतन देवर्डे यांनी तवेरा वाहन भरधाव वेगाने चालवून चुकीच्या बाजूला जाऊन खासगी आराम बसला धडक दिली. अपघात करून अपघातात जखमींच्या दुखापतीस व दोन्ही वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून तवेराचालक चेतन देवर्डे याच्यावर मंगळवारी रात्री देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A case has been registered against Taverachalak in Karambale accident case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.