हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:22 AM2021-07-11T04:22:23+5:302021-07-11T04:22:23+5:30
चिपळूण : बेकायदा गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या तिघांवर येथील पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकली. यात १ हजार ९८० रुपये ...
चिपळूण : बेकायदा गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या तिघांवर येथील पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकली. यात १ हजार ९८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पशुराम काशिराम कदम (६०, रा. रामपूर, चिपळूण), दत्ताराम बापू शिंदे (५८, रा. अलोरे - कोळकेवाडी, चिपळूण), मंगेश विठ्ठल मोहिते (४०, रा. पेढांबे, चिपळूण) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद दिलीप विठ्ठल जानकर (चिपळूण पोलीस स्थानक), उत्तम मल्लापा सासवे (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा), काशिनाथ महादेव रामपूरकर (अलोरे - शिरगाव पोलीस स्थानक) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पशुराम कदम हा रामपूर येथे, दत्ताराम शिंदे हा अलोरे - चेंबरीफाटी, तर मंगेश मोहिते हा नागावे चेंबरी परिसरातील जंगलमय भागात गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकली. यावेळी कदम याच्याकडून २५० रुपये, शिंदे याच्याकडून ९७० रुपये, तर मोहिते याच्याकडून ७६० रुपये किमतीच्या गावठी दारूसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी या तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.