कशेडी घाटात टँकरने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 11:09 AM2019-03-04T11:09:52+5:302019-03-04T11:11:50+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत कशेडी घाटामध्ये रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका टँकरने अचानक पेट घेतला. यावेळी कशेडी टॅप आणि पोलादपूर पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाणीवाहू टँकरने आग आटोक्यात आणली.

Cassidy catches the stomach with a tanker | कशेडी घाटात टँकरने घेतला पेट

कशेडी घाटात टँकरने घेतला पेट

Next
ठळक मुद्देकशेडी घाटात टँकरने घेतला पेटपोलादपूर पोलीसांनी घेतली घटनास्थळी धाव

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत कशेडी घाटामध्ये रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका टँकरने अचानक पेट घेतला. यावेळी कशेडी टॅप आणि पोलादपूर पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाणीवाहू टँकरने आग आटोक्यात आणली. मात्र टँकर धुमसत असल्याने महाड नगरपरिषद आणि खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबांनी आग पूर्णपणे विझविण्याचे काम केले.

पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटातील प्रतापगड पॉर्इंट भोगाव गावाच्या हद्दीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक ज्वालाग्रही रसायनवाहू टँकर (जीजे ०६एवाय ८१८८) हा गुजरातकडून लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये एमटीबीइ नावाचे केमिकल वाहून नेत असताना अचानक टँकरच्या ड्रायव्हर केबिन आणि पुढच्या टायर्समधून धूराचे लोट येऊन टँकरने पेट घेतला.

या घटनेची माहिती मिळताच पोलादपूरचे पोलीस उपनिरिक्षक भोईर, पोलीस नाईक इकबाल शेख, वाहतुक पोलीस विश्राम गुंजाळ, राज पवार, वसंत जाधव आदींनी तसेच कशेडी टॅपचे पोलिस नाईक तोडकर, तडवी, मोहिते, दूरगावडे, पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या दरम्यान, याच ठिकाणाहून पाणीवाहू ट्रॅक्टर जाताना पाहून या ट्रॅक्टरमधील पाण्याचा मारा करून पेटत्या टँकरची आग आटोक्यात आणली.

टँकरला आग लागल्यानंतर कशेडी घाटातील वाहतूक काहीशी मंदगतीने सुरू राहिल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. यामुळे खेड नगरपरिषद आणि महाड नगरपरिषदेचे अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला.

महाड नगरपरिषदेचा अग्निशमन बंब पोहोचताच तातडीने धुमसणाऱ्या टँकरवर पाण्याचा जोरदार मारा करून आग पूर्णत: विझविण्यात यश आले. यावेळी खेड नगरपरिषदेचा अग्निशमन बंब पोहोचला आणि त्याद्वारे घाटरस्त्यावर पडलेले निसरडे तेल व वंगणयुक्त पाणी धुवून रस्ता वाहतुकीला योग्य करण्यात आला.
 

Web Title: Cassidy catches the stomach with a tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.