श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूलला सीबीएसईची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:32 AM2021-05-07T04:32:37+5:302021-05-07T04:32:37+5:30
खेड : तालुक्यातील वेरळ येथील श्रीसमर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूलच्या अकरावी व बारावी ...
खेड : तालुक्यातील वेरळ येथील श्रीसमर्थ
कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूलच्या अकरावी व बारावी विज्ञान, वाणिज्य वर्गासाठी सीबीएसई बोर्डाने मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे माफक फीमध्ये उच्च माध्यमिक विभागाच्या अकरावी व बारावी विज्ञान व वाणिज्य शाखेत सीबीएसई बोर्डाअंतर्गत शिक्षण मिळण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
संस्थेने प्रशालेत पूरक प्रमाणात सोयी-सुविधांची उपलब्धता करून देत दर्जेदार विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रशालेने अल्पावधित गरूडझेप घेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्येही विद्यार्थी चमकले आहेत.
उच्च माध्यमिक विभागास सीबीएसई बोर्डाची मान्यता मिळाल्यानंतर संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे यांनी प्राचार्य डॉ. एस. एस. अली प्रशालेची यांच्यासह संस्था अल्पावधीत पदाधिकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. प्रशालेत उपलब्ध झालेल्या अकरावी व बारावी सीबीएसई बोर्डाच्या शिक्षणाचा पालकांनी लाभ घ्यावा, असे
आवाहन संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे यांनी केले आहे.