जिंदल विद्यामंदिर येथे ऑनलाईन योगा दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:11+5:302021-06-26T04:22:11+5:30
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील जिंदल विद्यामंदिर, रत्नागिरी (जयगड) या शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनी ऑनलाईन प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सकाळ ...
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील जिंदल विद्यामंदिर, रत्नागिरी (जयगड) या शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनी ऑनलाईन प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
सकाळ सत्रामध्ये शाळेतील मुलांनी प्रात्यक्षिक पाहून योगसाधना करण्याचा प्रयत्न केला. हे प्रात्यक्षिके शाळेची माजी विद्यार्थिनी गिरीजा घनवटकर हिने सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अरुंधती भोपळे हिने केले. योगाचे मानवी जीवनातील महत्त्व व योगाचा इतिहास श्रावणी पवार व दीक्षा चव्हाण यांनी सांगितला. आर्या शिर्के हिने आभार मानले.
दुपार सत्र हे योगाभ्यासावर चर्चात्मक सुसंवाद साधणारे होते. रुपाली गावडे यांनी सत्राची सुरुवात केली. कार्यक्रमात हरियाणाहून दिव्यकुमार, यु. ए. ई.हून निंगथोऊजाम रोबिंद्र सिंग, राजस्थानहून लेप्टनंट शरदसिंग भदोरिया, हिमाचल प्रदेशहून रितू रावत तर दिल्लीहून रितू व्होरा यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर विचारमंथन केले. त्यांच्याशी विनोद पिल्लाई यांनी संवाद साधला.
या कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा विभागाचे रणजित जाधव व प्रमोदिनी आग्रे यांनी केले हाेते. विद्यालयाच्या प्राचार्या तृप्ती वराठे यांनी सूत्रसंचालन केले.
--------------------------
जिंदल विद्यामंदिर (जयगड) रत्नागिरी शाळेत योगाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.