आंबडस विद्यालयात योग दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:21 AM2021-06-23T04:21:19+5:302021-06-23T04:21:19+5:30
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील आंबडस विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक खेडेकर यांनी योग ...
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील आंबडस विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक खेडेकर यांनी योग दिनाविषयी माहिती दिली़ प्राचीन काळापासून योगाभ्यासाला कसे महत्त्व होते व आता ताणतणावाच्या जीवनशैलीत त्याचे किती महत्त्व आहे, हे पटवून सांगितले.
क्रीडाशिक्षक व्ही़ पी़ कांबळे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे शास्त्रशुद्ध पद्धतीने योगासने शिकविली. तसेच प्रत्येक योगासनाचे काय फायदे आहेत, याबद्दल माहिती सांगितली. प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी एस़ बी़ चिले यांनी सहकार्य केले. या प्रात्यक्षिकात विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला हाेता. के़ व्ही़ कुंभार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर जी़ एम़ सावर्डेकर यांनी आभार मानले़