डेरवण येथे योग दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:22 AM2021-06-25T04:22:45+5:302021-06-25T04:22:45+5:30
अडरे : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रत्नागिरी, रत्नागिरी जिल्हा प्रशासन व रत्नागिरी जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्यातर्फे ...
अडरे : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रत्नागिरी, रत्नागिरी जिल्हा प्रशासन व रत्नागिरी जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्यातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस डेरवण येथील क्रीडासंकुलात सकाळी ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्याचे क्रीडाधिकारी किरण बोरवडेकर यांच्या मार्गदर्शनाने झाली. योगासने सर्वांनी कायमस्वरूपी करावीत, असे त्यांनी आवाहन केले़ त्यानंतर चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूलची राष्ट्रीय योग खेळाडू स्वराली उदय तांबे हिने योगासनाचे प्रकार करून दाखविले़ तसेच क्रीडाशिक्षक सोमनाथ सुरवसे यांनी प्राणायाम करून दाखविले. या कार्यक्रमासाठी जिम्नॅस्टिक क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर तसेच क्रीडाधिकारी विशाल बोडके, तालुका क्रीडाधिकारी रुही शिंगाडे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष उदयराज कळंबे, क्रीडासंकुलाचे संचालक श्रीकांत पराडकर यांचे मार्गदर्शन मिळाले़ तसेच डेरवण इंग्लिश मीडियम स्कूलचे क्रीडाशिक्षक मंगेश जाधव यांचे सहकार्य लाभले़ प्रस्तावना जिल्हाध्यक्ष उदयराज कळंबे यांनी केली. चिपळूणचे तालुकाध्यक्ष सोमनाथ सुरवसे यांनी आभार मानले.
-----------------------
डेरवण (ता़ चिपळूण) येथील क्रीडासंकुलात पार पडलेल्या याेगदिनानिमित्त स्वराली तांबे हिने याेगासन करून दाखविले़