योग सप्ताह साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:21 AM2021-06-23T04:21:07+5:302021-06-23T04:21:07+5:30
शिक्षकांवर अन्याय रत्नागिरी : कोरोनामुळे जिल्ह्यातील अनेक इंग्रजी माध्यमाच्च्या खासगी शाळांतील कंत्राटी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली ...
शिक्षकांवर अन्याय
रत्नागिरी : कोरोनामुळे जिल्ह्यातील अनेक इंग्रजी माध्यमाच्च्या खासगी शाळांतील कंत्राटी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.गेल्या मार्चपासून या शिक्षकांना ५० टक्के पगारातच काम करावे लागत आहे.
संतोष धोत्रे यांची निवड
खेड : तालुक्यातील आंबये येथील ॲड. संतोष धोत्रे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. युवा सेना सहसचिवपदी ॲड. संतोष धोत्रे यांची निवड करण्यात आली आहे. सचिव वरुण सरदेसाई यांच्या सहकार्याने निवड करण्यात आली आहे.
अँटिजन तपासणी
रत्नागिरी : जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे ग्रामदत्तक योजनेचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेच्या अनुषंगाने दत्तक घेतलेल्या भंडारपुळे येथील हनुमान मंदिरात जयगड पोलीस स्थानकातर्फे गावात अँटिजन तपासणी मोहीम राबविण्यात आली.
शेतीच्या कामांना वेग
चिपळूण : तालुक्यात शेतीची कामे वेगाने सुरू आहेत. मान्सूनपूर्व पावसावर पेरणीची कामे पूर्ण झाली होती. त्यानंतर जोमदार पावसामुळे भाताची रोपे चांगली वाढली आहेत. रोपे काढून लागवड करण्यात येत असल्याने लागवडीला शेतकऱ्यांनी प्रारंभ केला आहे.
गटारे साफ करण्याच्या सूचना
रत्नागिरी : गटारांवरील खोके बाजूला करून गटारे साफ करण्याची सूचना नगरपरिषदेने दिल्या आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे मुजावर चाळ परिसर व आसपासच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे गटारे तातडीने साफ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाअभावी उष्मा
रत्नागिरी : पावसाने गेले दोन दिवस विश्रांती घेतली आहे. कडकडीत ऊन कोसळत असल्याने उष्मा वाढला आहे. शेतकऱ्यांनी भात लागवडीला प्रारंभ केला आहे; मात्र पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाण्याची कमतरता भासू लागली आहे.
फणसोप येथे लसीकरण
रत्नागिरी : तालुक्यातील फणसोप, कसोप येथील ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लक्ष्मी केशव विद्यामंदिर येथे लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. या शिबिरात १८५ नागरिकांना लस देण्यात आली.
कृषी संजीवनी मोहीम
रत्नागिरी : कृषी विभागातर्फे कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम कांबळे लागवण येथे आयोजित करण्यात आला होता. पंचायत समिती सभापती संजना माने, जिल्हा परिषद नियोजन समिती सदस्य ऋतुजा जाधव, सरपंच प्रणाली मालप उपस्थित होते.
परदेशी नागरिकांसाठी लसीकरण
रत्नागिरी : नवनिर्मिती फाउंडेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र वांद्री यांच्या संयुक्त विद्यमाने परदेशी नाेकरी व शिक्षणासाठी जाणाऱ्याकरिता लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली होती. १३७ जणांनी याचा लाभ घेतला. फाउंडेशनने नेतृत्व केल्याने लस उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले आहे़