स्मशानभूमी कर्मचाऱ्यांचा मराठा समाजाकडून सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:33 AM2021-05-20T04:33:41+5:302021-05-20T04:33:41+5:30
खेड : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व त्यांचे अंत्यसंस्कार करण्यास नकार दिलेल्यांचा विधिवत अंत्यसंस्कार येथील स्मशाभूमीत करणाऱ्या नगर परिषदेच्या सफाई ...
खेड : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व त्यांचे अंत्यसंस्कार करण्यास नकार दिलेल्यांचा विधिवत अंत्यसंस्कार येथील स्मशाभूमीत करणाऱ्या नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा खेड शहर मराठा समाजाच्यावतीने सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. येथील नगर परिषद सभागृहात हा कार्यक्रम झाला.
कोरोनामुळे समाजाने नाकारलेल्या मृतदेहांवर खेड पालिकेच्या स्मशानभूमीत पालिकेचे स्वच्छता विभागातील कर्मचारी अंत्यसंस्कार करत आहेत. हे देवदूत स्वतःचा जीव धोक्यात घालून माणुसकीचे अनोखे दर्शन घडवत आहेत. हे काम करणारे कृष्णा गंगाराम निकम, अनिल तुळशीराम चव्हाण, सुनील दगडू जाधव, अरविंद हरिश्चंद्र सावंत, स्वप्नील चंद्रकांत जाधव, रामचंद्र संभाजी सावंत, शशिकांत पिंपळकर यांचा मराठा समाजातर्फे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष तथा मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, नगरसेवक प्रशांत कदम, अजय माने, अंकुश विचारे, नगरसेविका सुरभी धामणस्कर, नम्रता वडके, सीमा वंडकर, महेंद्र शिरगावकर यांच्यासह शरद शिर्के, नंदू साळवी, सतीश चिकणे, सुभाष देसाई, डॉ. अजित भोसले, सुरेश चिकणे, दीपक नलावडे, साळुंखे, सुहास भोसले, राजू आंबरे, अमोल दळवी, सिद्धेश साळवी, तुषार सापटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शरद भोसले यांनी केले.