दहावी, बारावी पुरवणी परीक्षेसाठी केंद्र निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:37 AM2021-09-17T04:37:30+5:302021-09-17T04:37:30+5:30
रत्नागिरी : कोकण विभागीय मंडळातर्फे सप्टेंबर- ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात येणारी बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर २०२१ ते ११ ऑक्टोबर ...
रत्नागिरी : कोकण विभागीय मंडळातर्फे सप्टेंबर- ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात येणारी बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर २०२१ ते ११ ऑक्टोबर २०२१ व दहावीची परीक्षा २२ सप्टेंबर २०२१ ते ८ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांसाठी जिल्ह्यातील परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.
बारावी पुरवणी परीक्षा केंद्र क्रमांक ६११- रत्नागिरी - एम. डी. नाईक ॲण्ड ए. एम. नाईक ज्युनिअर कॉलेज, रत्नागिरी येथे, केंद्र क्रमांक ६२१- चिपळूण - डी. बी. जे कॉलेज, चिपळूण येथे, केंद्र क्रमांक ६३१- दापोली - एन. के. वराडकर कला व आर. व्ही. बेलोसे वाणिज्य महाविद्यालय, दापोली येथे आयोजित केली आहे. तसेच दहावी पुरवणी परीक्षेसाठी केंद्र क्रमांक ६१०४- रत्नागिरी - फाटक हायस्कूल, सुभाष रोड, रत्नागिरी येथे, केंद्र क्रमांक ६२०४ -चिपळूण - युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण येथे, केंद्र क्रमांक ६३०१- दापोली - अल्फ्रेड गॉडने हायस्कूल, दापोली येथे, केंद्र क्रमांक ६४०४-राजापूर - राजापूर हायस्कूल, राजापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
परीक्षा कालावधीमध्ये परीक्षा केंद्रावर उमेदवारांकडून व अन्य व्यक्तीकडून गैरप्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे परीक्षा केंद्राच्या आवारात मनाई आदेश जाहीर केला आहे. त्यानुसार दोन्ही परीक्षेच्या प्रत्येक दिवशी परीक्षा केंद्राच्या स्थळाच्या ठिकाणापासून १०० मीटर परिसरात परीक्षेच्या प्रत्येक दिवशी सकाळी ८.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. त्यानुसार परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातील एसटीडी बूथ, झेरॉक्स
सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनिक्षेपण इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील, असे जाहीर केले आहे.