मुरूड येथील रिसाॅर्टची पुन्हा केंद्रीय पथकाकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:54+5:302021-07-07T04:38:54+5:30

दापोली : तालुक्यातील मुरुड समुद्र किनारी बांधण्यात आलेल्या रिसाॅर्टची साेमवारी केंद्रीय पर्यावरण सीआरझेड खात्याच्या पथकाने पाहणी केली. ए सुरूश ...

Central team re-inspects the resort at Murud | मुरूड येथील रिसाॅर्टची पुन्हा केंद्रीय पथकाकडून तपासणी

मुरूड येथील रिसाॅर्टची पुन्हा केंद्रीय पथकाकडून तपासणी

Next

दापोली : तालुक्यातील मुरुड समुद्र किनारी बांधण्यात आलेल्या रिसाॅर्टची साेमवारी केंद्रीय पर्यावरण सीआरझेड खात्याच्या पथकाने पाहणी केली. ए सुरूश कुमार यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसवेत या भागाला भेट दिली.

भाजपचे माजी खासदार किरीट साेमय्या यांनी मुरूड येथील रिसॉर्ट अनधिकृत असल्याची तक्रार पर्यावरण मंत्रालयाकडे केली आहे. याच तक्रारीच्या अनुषंगाने केंद्रीय विभागाच्या पथकाने मुरुड समुद्रकिनारी पाहणी दौऱा केला. यावेळी पथकासाेबत प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार वैशाली पाटील उपस्थित हाेते. किरीट सोमय्या यांनी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन आणि पर्यावरण खात्याची पायमल्ली केलेल्या १० रिसाॅर्टची तक्रार केंद्रीय पर्यावरण विभागाकडे केली आहे. यामध्ये मुरूड येथील रिसाॅर्टचाही समावेश आहे. हे रिसाॅर्ट रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दापोलीतील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याची सत्यता पडताळण्यात आली. हे पथक आपला अहवाल केंद्राच्या पर्यावरण विभागाला सादर करणार आहे. हा अहवाल काय असेल, याची कुठलीच माहिती या समितीने दिली नाही. मुरुडच्या किनारपट्टी भागात असलेल्या १० रिसाॅर्टची पाहणी या समितीने केली.

------------------------------

दापाेली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी केंद्रीय पर्यावरण विभागाच्या पथकाने साेमवारी रिसाॅर्टची पाहणी केली.

Web Title: Central team re-inspects the resort at Murud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.