शिवने-करंबेळे गावच्या सीमेवर रंगला ग्रामदेवतेच्या पालखी भेटीचा सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 06:57 PM2022-03-19T18:57:23+5:302022-03-19T18:58:11+5:30

देवरुख : ढोल-ताशांचा गजर, ग्रामदेवतेच्या नावाचा जयजयकाराने हजारो भाविकांच्या उपस्थितीत संगमेश्वर तालुक्यातील शिवने व करंबेळे गावच्या सीमेवर ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा ...

Ceremony of the palanquin visit of Rangala village deity on the border of Shivne-Karambele village | शिवने-करंबेळे गावच्या सीमेवर रंगला ग्रामदेवतेच्या पालखी भेटीचा सोहळा

शिवने-करंबेळे गावच्या सीमेवर रंगला ग्रामदेवतेच्या पालखी भेटीचा सोहळा

googlenewsNext

देवरुख : ढोल-ताशांचा गजर, ग्रामदेवतेच्या नावाचा जयजयकाराने हजारो भाविकांच्या उपस्थितीत संगमेश्वर तालुक्यातील शिवने व करंबेळे गावच्या सीमेवर ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा अनोखा सोहळा आज, शनिवारी सायंकाळी रंगला. हा भव्यदिव्य सोहळा पाहण्यासाठी तालुक्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

तालुक्यातील करंबेळे - शिवने येथील सीमेवर देवरुख-संगमेश्वर मार्गावर दोन बहिणीच्या पालख्यांची आगळीवेगळी भेट पाहण्यासाठी हजारो भक्तगण उपस्थित होते. ही पालख्यांची भेट म्हणजे केवळ दोन गावातीलच नव्हे तर तालुक्यातील भक्तगणांसाठी एक मोठा सोहळाच असतो.  आजूबाजूच्या गावातील शिमगोत्सव संपन्न झालेले असल्याने करंबेळे व शिवने गावच्या सीमेवर होणारी दोन बहिणींच्या पालकीची भेट पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळते. शिवणे गावच्या पालखीतील ग्रामदेवता रवळनाथ, नवलाई, व पावणाई असून करंबेळे गावच्या पालखीत ग्रामदैवत गांगोबा, देवी निनावी व वाघजाई अशी ग्रामदैवत असतात.

भेटीमध्ये ओटींची अदलाबदल

शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दोन्ही गावातील पालखी वाजत गाजत जल्लोषात सीमेवर आणण्यात आल्या. दोन्ही पालख्यांची  भेट घडवून आणताना भक्तगण आपल्या खांद्यावर भक्तांना उभे करून त्यांच्या खांद्यावर दोन्ही पालख्या देतात व ही अनोखी भेट घडवून आणली जाते. या वर्षी ही भेट दुपारी ३.१५ वाजता घडली. या भेटीमध्ये दोन्ही पालख्यांमधील ओटींची अदलाबदल होते ही या पालखी भेटीचे वैशिष्ट्य आहे.

भेटी नंतर शिवने गावच्या हद्दीत दोन्ही पालख्या नाचविल्या जातात. यावेळी शिवने येथे गाऱ्हाणी, नवस बोलले जातात. त्यानंतर करंबेळे गावची देवी आपल्या शिवने गावच्या बहिणीला म्हणजेच ग्रामदेवतेच्या पालखीला पाच पावले पुढे जाऊन निरोप देते. पूर्वीच्या काळी हे दोन गाव एकच होते. त्यानंतर गाव वेगवेगळे झाल्या नंतर या दोन पालख्यांची म्हणजेच बहिणींनीची भेट प्रतिवर्षी घडविली जाते. अशी आख्यायिका सांगितली जाते.

उत्सवादरम्यान मार्गाच्या दुतर्फा व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली होती. या ठिकाणी मोठी यात्रा भरली होती. आबालवृद्धांनी  या पालखी भेट सोहळाचा आनंद लुटला.  दरम्यान सोहळ्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मार्गावर वाहतुकीमध्ये कोणताही अडथळा होऊ नये यासाठी देवरुखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव  व संगमेश्वरचे निरीक्षण उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

Web Title: Ceremony of the palanquin visit of Rangala village deity on the border of Shivne-Karambele village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.