प्रमाणपत्र वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:27 AM2021-04-03T04:27:52+5:302021-04-03T04:27:52+5:30
ग्रंथालयाचे उद्घाटन राजापूर : तालुक्यातील ओणी येथील वात्सल्य मंदिर बालकाश्रमामध्ये कै. सावित्री केरू गोंडाळ स्मृती ग्रंथालयाचे उद्घाटन दिनांक ४ ...
ग्रंथालयाचे उद्घाटन
राजापूर : तालुक्यातील ओणी येथील वात्सल्य मंदिर बालकाश्रमामध्ये कै. सावित्री केरू गोंडाळ स्मृती ग्रंथालयाचे उद्घाटन दिनांक ४ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. मातृमंदिरचे कार्यवाह आत्माराम मेस्त्री यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका मानसी हजेरी, नूतन विद्यामंदिरच्या ग्रंथपाल वृंदा कुशे उपस्थित राहणार आहेत.
पाण्याची टंचाई
रत्नागिरी : जिल्ह्यातील छोटी-मोठी नऊ बसस्थानके आणि छोट्या-मोठ्या बसस्थानकातून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असून, त्याचे निवारण करावे अशी मागणी करण्यात येत आहे. उष्म्यामध्ये वाढ झाल्याने पाण्याचाही वापर वाढला आहे. ऐन उकाड्यात पाणी उपलब्ध होत नसल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.
क्रीडा साहित्याचे वाटप
चिपळूण : येथील रेणुका माता नागा विद्यार्थिनी छात्रावास (रा. स्व. संघ) जनकल्याण समितीचा उपक्रम म्हणून पूर्वांचल राज्यातील विद्यार्थिनींसाठी चालविले जाते. या विद्यार्थिनींसाठी क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. घरडा फाउंडेशन यांनी विद्यार्थिनींसाठी क्रीडा साहित्याचे वाटप केले.
एटीएममध्ये खडखडाट
खेड : शिमगोत्सवामुळे जोडून सुटी आल्याने बँकांचे व्यवहार बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांना एटीएमचाच पर्याय वापरावा लागत आहे. मात्र, सुट्यांमुळे ठेकेदार कंपनीने पैसे न भरण्याची भूमिका ठेवली असल्याने परिसरातील ग्राहकांची गैरसोय होत आहे.
आजपासून हॉलतिकिटे
रत्नागिरी : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दिनांक २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान बारावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता हॉलतिकिट उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रवेशपत्रावर विषय व माध्यमबदल हवा असेल तर तातडीने कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.