रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:37 AM2021-09-24T04:37:34+5:302021-09-24T04:37:34+5:30

रत्नागिरी : गेल्या वर्षभरात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नियोजनबध्द काम केले व कोरोना काळात विविध उपक्रम राबवत ...

Certificate of World Book of Records to the Superintendent of Police, Ratnagiri | रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र

रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र

Next

रत्नागिरी : गेल्या वर्षभरात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नियोजनबध्द काम केले व कोरोना काळात विविध उपक्रम राबवत कोरोनाबाबत जनजागृती केली. चिपळूणमध्ये पूरस्थितीत रत्नागिरी पोलिसांनी केलेली कामगिरीची दखल संपूर्ण महाराष्ट्राने घेतली. या सर्व कामगिरीचा आलेख पाहता पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’कडून दखल घेऊन प्रमाणपत्र पाठविण्यात आले आहे.

जिल्ह्याचे पोलीस दल आणि जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे. डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी यापूर्वी गडचिरोली येथे त्यांनी उत्तम काम केले आहे. गेल्यावर्षी रत्नागिरी जिल्ह्याच्या पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस दलात विविध आधुनिक बदल केले आहेत. डॉ. गर्ग यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनामुक्त ठेवण्याकरिता शिबिरे घेतली व अमलदार तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी सुसज्ज कोरोना सेंटर उभे केले.

ग्रामीण भाग कोरोनामुक्त राहावा, यासाठी पोलिसांच्या माध्यमातून गाव दत्तक योजना हा उपक्रम राबवला. जुलै महिन्यात चिपळूण शहरात आलेल्या महापुराप्रसंगी हजारो कुटुंबांचे संसार पाण्याखाली गेले होते. सर्व यंत्रणा मदतीला जाण्याअगोदरच जिल्हा पोलीस सर्वप्रथम मदतीला पोहोचले. कोरोना रुग्ण व जे कोणी नातेवाईक असतील अशा सर्वांना सर्वप्रथम सुरक्षेच्या स्थळी नेण्याचे पोलिसांनी केले. तसेच कोरोना काळात आरोग्य यंत्रणेला काही अडचण आली तर त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी मदतीचा हात दिला. वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्डस लंडनकडून या सर्व कामाची दखल घेऊन प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले आहे.

Web Title: Certificate of World Book of Records to the Superintendent of Police, Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.