चाकरमानी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:34 AM2021-09-21T04:34:21+5:302021-09-21T04:34:21+5:30

रत्नागिरी : पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर बहुसंख्येने चिपळूण तालुक्यात दाखल झालेले चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी निघाल्याने एसटीसह रेल्वे व खासगी ...

Chakarmani left | चाकरमानी रवाना

चाकरमानी रवाना

Next

रत्नागिरी : पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर बहुसंख्येने चिपळूण तालुक्यात दाखल झालेले चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी निघाल्याने एसटीसह रेल्वे व खासगी वाहनांनाही मोठी गर्दी होऊ लागली आहे. दोन दिवसांत चाकरमान्यांनी भरून तब्बल १२६ एसटी बसेस रवाना झाल्या.

मोफत उपचार करा

रत्नागिरी : जिल्ह्यात दुभती जनावरे, बैल व इतर जनावरांना लम्पी रोगाची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. त्यांना तातडीने औषधे मोफत मिळण्यासाठी रत्नागिरी जिल्हा काँग्रेसतर्फे निवेदनाद्वारे दुग्धविकास पशुपालनमंत्री सुनील केदार यांच्याकडे मागणी करण्यात आली.

बांधकाम व्यावसायिक चिंतेत

रत्नागिरी : जिल्ह्यात सिमेंटचे भाव गगनाला भिडल्याने बांधकाम व्यावसायिक चिंतेत पडले आहेत. जिल्ह्यात होणारी विविध बांधकामे तसेच इमारती, औद्योगिक बांधकामे अशा सर्वच ठिकाणी सिमेंटची आवश्यकता भासते; परंतु दिवसेंदिवस सिमेंटचे दर वाढत चालले आहेत.

शैक्षणिक साहित्य वाटप

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या निमित्ताने तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रांत नेहमीच योगदान देणाऱ्या तरुण विकास मंडळ वाटद-मिरवणे मंडळातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी निसर्गसंवर्धनाचे प्रतीक म्हणून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: Chakarmani left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.