महावितरणपुढे ३७ कोटी ६० लाखांच्या वसुलीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:32 AM2021-03-31T04:32:48+5:302021-03-31T04:32:48+5:30

रत्नागिरी : वीज बिल वसुलीमध्ये अग्रक्रमावर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात कोट्यवधींची थकबाकी असल्याने महावितरणपुढे वसुली करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. ...

Challenge of recovery of 37 crore 60 lakhs before MSEDCL | महावितरणपुढे ३७ कोटी ६० लाखांच्या वसुलीचे आव्हान

महावितरणपुढे ३७ कोटी ६० लाखांच्या वसुलीचे आव्हान

Next

रत्नागिरी : वीज बिल वसुलीमध्ये अग्रक्रमावर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात कोट्यवधींची थकबाकी असल्याने महावितरणपुढे वसुली करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार ५१२ ग्राहकांकडे १८ मार्चपर्यंत ५२ कोटी ५४ लाख ९९ हजार रुपयांची थकबाकी होती. मात्र, गेल्या काही दिवसांत ४१ हजार २०८ ग्राहकांनी १४ कोटी ९४ कोटी रुपयांचा भरणा केला असला तरी अद्याप ९१ हजार ३०४ ग्राहकांकडे ३७ कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी अद्याप शिल्लक आहे.

कोरोनामुळे गतवर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते, संसर्ग रोखण्यासाठी तीन महिन्यांनंतर एकत्रित वीज बिले पाठविण्यात आल्याने काही ग्राहकांनी वीज बिलेच भरली नाहीत. मार्चपासून थकबाकी शिल्लक असतानाच अन्य काही ग्राहकांचीही काही बिले थकीत राहिल्याने वर्षभरात थकबाकीच्या रकमेत कमालीची वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील ६९ हजार ५२३ घरगुती ग्राहकांनी वीज बिले न भरल्यामुळे १३ कोटी ४३ लाख ५४ हजार, वाणिज्यिकच्या ९ हजार २९२ ग्राहकांकडे ६ कोटी ८८ लाख, औद्योगिकच्या १६०४ ग्राहकांकडे ४ कोटी ५७ लाख ८ हजार रुपये थकबाकी शिल्लक आहे. कृषीच्या ४७०९ ग्राहकांकडे ४६ लाख ८४ हजार, पथदीपचे १४२५ ग्राहकांकडे ८ कोटी ३० लाख २१ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या १११५ ग्राहकांकडे २ कोटी ६३ लाख २९ हजार रुपये शिल्लक आहेत. सार्वजनिक सेवेंतर्गत १९७९ ग्राहकांकडे १ कोटी २३ लाख ७९ हजार रुपये, इतर १६५७ ग्राहकांकडे ८५ लाख ८२ हजार रुपये थकबाकी शिल्लक आहे.

चिपळूण विभागातील १८ हजार ६७९ ग्राहकांकडे ४ कोटी २४ लाख ७९ हजार, वाणिज्यिकच्या २६८५ ग्राहकांकडे २ कोटी ६ लाख ९९ हजार, औद्योगिकच्या ३९३ ग्राहकांकडे एक कोटी १४ लाख १६ तसेच कृषी, पथदीप, सार्वजनिक सेवा, पाणीपुरवठा विभाग व इतर मिळून एकूण २४ हजार १२१ ग्राहकांकडे १० कोटी २३ लाख ९७ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

खेड विभागातील १९ हजार ३६ घरगुती ग्राहकांकडे ३ कोटी ४५ हजार, वाणिज्यिकच्या २११५ ग्राहकांकडे १ कोटी २६ लाख ३ हजार, औद्योगिकच्या ४०९ ग्राहकांकडे १ कोटी २२ लाख ९३ हजार तसेच अन्य सर्व ग्राहक मिळून एकत्रित २४ हजार १८१ ग्राहकांकडे ९ कोटी ४५ लाख २ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.

रत्नागिरी विभागातील ३१ हजार ८०८ घरगुती ग्राहकांकडे ६ कोटी १८ लाख ३० हजार, वाणिज्यिकच्या ४४९२ ग्राहकांकडे २ कोटी ७६ लाख ८७ हजार, औद्योगिकच्या ८०२ ग्राहकांकडे २ कोटी १९ लाख ९८ हजार तसेच अन्य सर्व ग्राहकांची मिळून एकूण ४३ हजार ७ ग्राहकांकडे १७ कोटी ९१ लाख ४५ हजार रुपयांची थकबाकी आहे. मार्चअखेरपर्यंत थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट असल्याने थकबाकी वसुलीसाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत असतानाही ग्राहकांकडून तितकासा प्रतिसाद लाभत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

Web Title: Challenge of recovery of 37 crore 60 lakhs before MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.