चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा केली महामार्गाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 05:24 AM2018-09-09T05:24:17+5:302018-09-09T05:24:23+5:30

दुरवस्था झालेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण ते लांजापर्यंतच्या रस्त्याची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी शनिवारी केली.

Chandrakant Patil reviewed the highway again | चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा केली महामार्गाची पाहणी

चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा केली महामार्गाची पाहणी

Next

रत्नागिरी : दुरवस्था झालेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण ते लांजापर्यंतच्या रस्त्याची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी शनिवारी केली. पाटील यांनी या महामार्गावरील सायन-पनवेल मार्गाची शुक्रवारी पाहणी केली
होती.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात मुंबई ते कणकवली या रस्त्याच्या कामाचा पाटील यांनी आढावा घेतला आणि त्या वेळी ज्या ठिकाणी रस्ते खराब, रस्त्यावर खड्डे आहेत, ते तत्काळ भरण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार महामार्गावरील आरवली ते संगमेश्वर यादरम्यानचा रस्ता वगळता इतर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे समाधानकारक काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पाटील यांनी सकाळी ७ वाजता चिपळूणहून महामार्ग पाहणीला सुरुवात केली. या वेळी संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावाजवळील रस्त्याची पाहणी करताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम लवकरच पूर्ण होईल. हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार असल्याने भविष्यात खड्डे ही समस्या राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
>गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण होणार
आरवली ते संगमेश्वर यादरम्यानचा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होईल. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी येणाºया चाकरमान्यांना महामार्गावर वाहतुकीस कोणतीही अडचण निर्माण होणार नाही व त्यांचा प्रवास सुखकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Chandrakant Patil reviewed the highway again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.