कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल, दापोली विद्यापीठात विद्यार्थ्यांनी केले मुंडन आंदोलन
By अरुण आडिवरेकर | Published: February 4, 2023 06:49 PM2023-02-04T18:49:38+5:302023-02-04T18:50:16+5:30
गेल्या ११ दिवसांपासून आंदोलन सुरू
दापोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदलल्याने गेल्या ११ दिवसांपासून दापोली कृषी विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकी पदवीधारक विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दापाेलीतील विद्यापीठात आंदाेलक विद्यार्थ्यांनी शनिवारी (४ फेब्रुवारी) मुंडन करून सरकारचा निषेध केला. माजी आमदार संजय कदम यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.
दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी शासनाला लवकरच जाग येऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, तालुकाप्रमुख ऋषी गुजर, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे उपस्थित होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदलल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आंदाेलन सुरू केले आहे. या आंदोलनाकडे सरकारने अद्याप दुर्लक्ष केले आहे. मुंडन आंदोलनानंतरही न्याय न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे.