तिडे-नालासोपारा बसच्या मार्गात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:35 AM2021-08-13T04:35:55+5:302021-08-13T04:35:55+5:30
मंडणगड : सावित्री नदीवरील आंबेत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या मंडणगड-तिडे-तळेघर-नालासोपारा या बससेवेच्या ...
मंडणगड : सावित्री नदीवरील आंबेत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या मंडणगड-तिडे-तळेघर-नालासोपारा या बससेवेच्या मार्गात दि. १२ ऑगस्टपासून बदल करण्यात आला आहे.
ही बससेवा मंडणगड येथून सकाळी ८.४५ वाजता सुटून केळवत, कुंबळे, तिडे, तळेघर, सडे, आतखोल, शेनाळे, म्हाप्रळ, आंबेत, पुरार, श्रीवर्धन फाटा, गोरेगाव, लोणेरे, माणगांव, इंदापूर, कोलाड, नागोठणे, वडखल, रामवाडी, पनवेल, कोकणभवन, नेरूळ जुईनगर, कळवा नाका, ठाणे खोपट, घोडबंदर, वसई फाटा, नालासोपारा येथे सायंकाळी साडेचार वाजता पाेहाेचेल. परतीच्या प्रवासाकरिता नालासोपारा येथून सकाळी साडेसहा वाजता सुटणार आहे. मार्गात बदल केल्याने प्रवासाचा वेळ एक तास कमी होणार आहे. यापूर्वी प्रवाशांना २४ किलाेमीटरचा तिकिटांचा अतिरिक्त भार पडत होता तो कमी होणार आहे.
या बसचे संगणकीय आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बससेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे समन्वय समिती संपर्कप्रमुख वैभव बहुतूले, कल्याण सावंतवाडी रेल्वे समन्वय समिती कल्याण ग्रुप ग्रामपंचायत तिडे, तळेघरतर्फे करण्यात आले.