दापोलीत सापडलेला चरस गुजरातमधील पाकिटांशी मिळती जुळती; पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची माहिती

By अरुण आडिवरेकर | Published: August 15, 2023 02:04 PM2023-08-15T14:04:22+5:302023-08-15T14:04:32+5:30

रत्नागिरी पोलिस मैदानावर आयोजित केलेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Charas found in Dapoli matches packets from Gujarat; Information from Superintendent of Police Dhananjay Kulkarni | दापोलीत सापडलेला चरस गुजरातमधील पाकिटांशी मिळती जुळती; पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची माहिती

दापोलीत सापडलेला चरस गुजरातमधील पाकिटांशी मिळती जुळती; पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची माहिती

googlenewsNext

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील मुरुड येथे समुद्रकिनारी केतकीच्या बनात सापडलेल्या चरसची पाकीट ही गुजरात येथे सापडलेल्या पाकिटांशी मिळती जुळती असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याबाबत गुजरात पोलिसांशी संपर्क साधण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

रत्नागिरी पोलिस मैदानावर आयोजित केलेल्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी विनीत चौधरी उपस्थित होते. दापोली तालुक्यातील मुरुड येथे काल, समुद्रकिनारी केतकीच्या बनात १२ किलो अफगाणी चरस सापडला. याबाबत पत्रकारांनी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना विचारले त्यावर ते म्हणाले की, प्राथमिक माहितीनुसार ते समुद्रातून वाहत आल्याचा अंदाज आहे.

तरीही पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे. फॉरेन्सिक लॅब, डॉग स्काॅड, दहशतवादी विरोधी पथकाचे पोलिस त्याठिकाणी गेले होते. मुरूड, कर्दे किनारी सापडलेली पाकीट गुजरातमध्ये सापडलेल्या पाकिटांशी मिळती जुळती आहेत. यासंदर्भात गुजरात येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील पोलिस स्थानकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, थोड्याशा हव्यासापोटी, कुठल्यातरी मोहापोटी आपण बळी पडतो. जगात कोणती गोष्ट फुकट मिळत नाही. घरबसल्या कोणी नोकरी देत नाही. त्यामुळे अशा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी केले.

Web Title: Charas found in Dapoli matches packets from Gujarat; Information from Superintendent of Police Dhananjay Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.