मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:31 AM2021-07-31T04:31:37+5:302021-07-31T04:31:37+5:30
लांजा : जमीन विकत घेतली त्यांचे परत न दिल्याच्या रागातून संगणमत करून काठीने मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात ...
लांजा : जमीन विकत घेतली त्यांचे परत न दिल्याच्या रागातून संगणमत करून काठीने मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आगवे जोशीवाडी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, महेंद्र गणपत आलीम (२९, रा. जोशीगाव आगवे) यांनी हरचिरी धनगरवाडी येथील संतोष झोरे यांना ६० हजाराला जमीन विकली होती. त्यानंतर संतोष झोरे याला ही जागा पसंत नसल्याने झालेला व्यवहार रद्द करण्यात आला होता. त्यावेळी महेंद्र आलीम यांनी घेतलेले ६० हजार रुपये मिळतील तसे थोडे - थोडे परत करण्याचा विश्वास दिला होता. २६ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता आगवे जोशीवाडी येथे येऊन संतोष झोरे, विलास आखाडे व त्यांच्या समवेत दोघे जण यांनी महेंद्र याला पैसे परत करण्याची दमदाटी करत चिव्याच्या बांबूने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. यामध्ये महेंद्र हा जखमी झाला होता. अधिक तपास लांजा पाेलीस करीत आहेत.