दुर्गादेवीचा रथाेत्सव, आंजर्लेवासीयांनी जाेपासलीय १६व्या शतकापासूनची परंपरा (व्हिडिओ)
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 03:40 PM2022-04-19T15:40:58+5:302022-04-19T15:42:09+5:30
दोन वर्षानंतर कोकणातील अनेक गावात यात्रेला चांगलाच बहर आला आहे. दापाेली तालुक्यातील आंजर्ले गावात दुर्गादेवीच्या उत्सवालाही सुरुवात करण्यात आली आहे.
दापाेली : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे सर्वत्र सण, उत्सव आनंदाने साजरे केले जात आहेत. दोन वर्षानंतर कोकणातील अनेक गावात यात्रेला चांगलाच बहर आला आहे. दापाेली तालुक्यातील आंजर्ले गावात दुर्गादेवीच्या उत्सवालाही सुरुवात करण्यात आली आहे. दुर्गादेवीच्या रथाेत्सवाची ही परंपरा १६ व्या वर्षापासून जाेपासली जात आहे.
मंगळवारी सकाळी दुर्गादेवीच्या पूजेनंतर रथाेत्सवाला सुरुवात करण्यात आली. दुर्गादेवी रथ ओढत गावकरी संपूर्ण गावात फिरत हाेते. दुर्गादेवी रथोत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ आंजर्ले गावात येऊन दाखल झाले हाेते. माहेरवासींनी रथाची व देवीची पूजा केली. दुर्गादेवीच्या उत्सवामुळे गावातील वातावरण आनंदी बनले आहे.
दुर्गादेवी मंदिर हे गावातील प्रमुख देवालय आहे. हे मंदिर १६ व्या शतकात स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मंदिरामध्येगंडकी शिळेची अष्टभुजा महिषासुमर्दिनी रूपातील मूर्ती आहे. ती थोरले बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत आषाढ शुद्ध प्रतिपदा शके १९५३ (इ.स. ५ जुलै १७३१) मध्ये स्थापन करण्यात आली आहे. या मूर्तीच्या मागे तांब्याची प्रभावळ आहे.
रत्नागिरी : दुर्गादेवीचा रथोत्सव, आंजर्लेवासीयांनी जोपासलीय १६ व्या शतकापासूनची परंपरा (व्हिडिओ- शिवाजी गोरे)https://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/vaLh7IukUW
— Lokmat (@lokmat) April 19, 2022