एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व - रफिक नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:34 AM2021-09-27T04:34:12+5:302021-09-27T04:34:12+5:30
रफिकशेठ नाईक यांनी ओशियानिक प्रा.लि., रफिक नाईक एक्स्पोर्ट प्रा.लि.,नाईक ॲण्ड कोल्ड स्टोअरेज व नाईक सी फूडच्या माध्यमातून नाईक उद्याेग ...
रफिकशेठ नाईक यांनी ओशियानिक प्रा.लि., रफिक नाईक एक्स्पोर्ट प्रा.लि.,नाईक ॲण्ड कोल्ड स्टोअरेज व नाईक सी फूडच्या माध्यमातून नाईक उद्याेग समूहाचा प्रचंड विस्तार केला व कोकणच्या या सुपुत्राने जगाच्या कानाकोपऱ्यात कोकणाला कीर्ती मिळवून दिली. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक संस्थांना प्रगतिपथावर नेण्यात मोलाचे योगदान दिले. त्यांनी आयडियल एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटी- विश्वस्त व अध्यक्ष, अंजुमन ए- इस्लाम संचालित एम.एच. साबुसिद्दीक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भायखळा मुंबई- कार्यकारी अध्यक्ष, जामिया अरबिया मदरसा उद्यम नगर - अध्यक्ष, उद्यमनगर औद्योगिक संस्था - संचालक संचालक अशा अनेक संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण पदे भूषवली. या पदांच्या माध्यमातून प्रगतीचे पाऊल टाकत राहिले.
रफिकशेठ नाईक म्हणजे शिक्षण प्रवाहातील नवनवीन बदल विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणण्याची दूरदृष्टी असलेले प्रभावी व्यक्तिमत्त्व. व्यवसायानिमित्त जगभरात फिरताना त्यांनी जे- जे अनुभव घेतले घेतले ते आपल्या शाळेत आपल्या मुलांमध्ये रुजावे व स्पर्धेच्या या युगात विद्यार्थी कोठेही कमी पडू नयेत, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांनी काळाची गरज ओळखून सेमी केल्ले इंग्लिशचे वर्ग सुरू केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी आपापल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रफिक नाईक (अध्यक्ष) व मुनीर शेख (उपाध्यक्ष) यांनी लाखो रुपयांचे संस्थेला आर्थिक साहाय्य देऊन ई-लर्निंग शिक्षण सुविधा सुरू केली. विद्यार्थ्यांना व्यायामाची सवय लागावी म्हणून व्यायामशाळा सुरू केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेच्या बाजूने संरक्षक भिंत बांधली. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने वर्गखोल्यांच्या आवश्यकतेनुसार नवीन पाच मजली इमारत बांधून घेतली. खेळाचे साहित्य, विज्ञान साहित्य, तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वह्या, गणवेश, अभ्यासपूरक साहित्याची सढळ हस्ते मदत केली. शाळेच्या चांगल्या निकालाची परंपरा अखंड जपली. खऱ्या अर्थाने अनेक सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक संस्थांचे आधारस्तंभ म्हणजे रफिकशेठ नाईक हाेते. नेहमी हसरा चेहरा, साधेपणा, प्रतिष्ठा, पत असूनही गर्व नाही, निष्ठावान, दूरदृष्टी, ध्येयवृत्ती व आपुलकी राखणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे रफिकशेठ नाईक.