चारसूत्री भात लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:21 AM2021-07-21T04:21:45+5:302021-07-21T04:21:45+5:30

मंडणगड : तालुक्यात पारंपरिक भात लागवडीसोबत आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा अवलंब करण्यास शेतकऱ्यांनी प्रारंभ केला आहे. तालुक्यात १२० हेक्टरवर चारसूत्री ...

Charsutri paddy cultivation | चारसूत्री भात लागवड

चारसूत्री भात लागवड

Next

मंडणगड : तालुक्यात पारंपरिक भात लागवडीसोबत आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा अवलंब करण्यास शेतकऱ्यांनी प्रारंभ केला आहे. तालुक्यात १२० हेक्टरवर चारसूत्री आणि पाच हेक्टरवर सगुणा राईस तंत्रज्ञानाचा वापर करून भात लागवड करण्यात आली आहे. तसेच लाल आणि काळा भात लागवडीचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले आहे.

संस्थेकडून धान्य वाटप

आवाशी : सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या खेड भरणेनाका येथील आई फाउंडेशन संस्थेच्या खजिनदार अवंतिका शिरोडकर यांच्याकडून चिपळूण येथील झोपडपट्टीमध्ये अन्नधान्याचे तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी या फाउंडेशनच्या क्लर्क शर्मिला महाकाळ, सुपरवायझर श्रावणी माणके आदी उपस्थित होत्या.

रस्त्याची चाळण

लांजा : केळवली फाटा येथील चिंचुर्टी धावडेवाडीमार्गे जाणाऱ्या रस्त्याची पूर्णत: चाळण झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक, पादचारी यांना ये-जा करताना जीव मुठीत धरावा लागतो. धावडेवाडीजवळील मोरी खचल्याने रस्त्याचा एक भाग पूर्णत: कोसळला आहे.

शेतीच्या कामाला वेग

मंडणगड : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे रखडलेल्या भात लावणीच्या कामांना आता वेग आला आहे. शेतकरी सध्या दिवसभर शेतात असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. यंदा भातपेरणीची कामे वेळेवर झाल्याने लावणीही वेळेत उरकण्याकडे अधिक कल दिसत आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेत यश

सावर्डे : चिपळूण तालुक्यातील कातरोळी कुंभारवाडी येथील विक्रांत टेरवकर याने विविध ३३ प्रकारच्या एकूण २०० राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अनोखा विक्रम केला आहे. त्याने २९ स्पर्धा जिंकल्या आहेत. बुद्धीकौशल्याचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेल्या या स्पर्धांमध्ये त्याने मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Web Title: Charsutri paddy cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.