चवंडे परिवाराने अर्पण केली भैरी बुवांना मानाची पगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:32 AM2021-04-04T04:32:02+5:302021-04-04T04:32:02+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी बुवांच्या सजलेल्या मूर्तीला यावर्षी शहरातील चवंडे वठार येथील ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी बुवांच्या सजलेल्या मूर्तीला यावर्षी शहरातील चवंडे वठार येथील चवंडे बंधूनी मानाची पगडी घातली.
दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला श्रीदेव भैरी बुवा ग्रामप्रदक्षिणेला पालखीतून बाहेर पडतात. यावेळी मूर्तीला सजवले जाते. त्यात देवाच्या डोक्यावरील पगडीमुळे त्यांचे रूप अधिकच खुलून दिसते. यावर्षी ही पगडी चवंडे कुटुंबीयांकडून परिधान करून घ्यावी, अशी विनंती संकेत चवंडे यांनी श्रीदेव भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांच्याकडे केली होती. या विनंतीला मान देऊन यंदाच्या पगडी घालण्याचा मान चवंडे कुटुंबीयांना देण्यात आला. यावेळी मुन्ना सुर्वे यांच्यासह बारा वाड्यांच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत पगडीचे गाऱ्हाणे सुद्धा घालण्यात आले. यावेळी वृषाली चवंडे, संकेत चवंडे, मीलन चवंडे, स्वामी चवंडे, आस्था चवंडे, निखिल फगरे, वृंदा तोरस्कर हे उपस्थित होते.
चाैकट
पगडीला ९ ग्रह
ही पगडी घुडे वठार येथील मूर्तिकार कलाकार प्रकाश घुडे यांनी तयार केली होती. या पगडीला सोन्याचे पान लावण्यात आले आहे तर ९ ग्रहसुद्धा लावण्यात आले आहेत.