नाचणेतील दुकानदारांना तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:32 AM2021-05-21T04:32:02+5:302021-05-21T04:32:02+5:30
रत्नागिरी: काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडून भाजीपाला, अंडी, चिकन, अन्य खाद्यपदार्थ सकाळी ७ ते ११ या वेळेत विकण्याची मुभा दुकानदारांना देण्यात ...
रत्नागिरी: काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडून भाजीपाला, अंडी, चिकन, अन्य खाद्यपदार्थ सकाळी ७ ते ११ या वेळेत विकण्याची मुभा दुकानदारांना देण्यात आली. मात्र, काही ठिकाणी याची योग्य पध्दतीने अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. नाचणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बांधकाम साहित्याची विक्री न करणारी दुकानेही दुपारी १ वाजेपर्यंत सुरू असतात. या दुकानदारांना पाेलिसांकडून तंबी देण्यात आली आहे.
तौक्तेमुळे दोन नौकांना जलसमाधी
रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळामुळे सैतवडे येथील जफर खतीब यांची युसरा सरताज नामक नौकेला जलसमाधी मिळाल्यामुळे खतीब यांचे सुमारे ६ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच गुहागर तालुक्यातील हेदवी येथील तुकाराम नारायण अडूरकर यांची जय महाकाली नौका पाण्यात बुडून १४ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती मत्स्य विभागाच्या जयगड परवाना अधिकारी स्मितल कांबळे यांनी दिली.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी
राजापूर : तौक्ते चक्रीवादळामुळे राजापूर तालुक्याच्या किनारपट्टी भागात झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर आमदार राजन साळवी, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, तहसीलदार प्रतिभा वराळे आदींनी किनारपट्टीवरील गावांना भेट देत माहिती घेतली.