मिरजाेळे येथून गावठी दारूचे रसायन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:32 AM2021-05-08T04:32:49+5:302021-05-08T04:32:49+5:30
रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे-पाटीलवाडी येथे ५६,१०० रुपयांचे गूळ व नवसागरमिश्रित कुजके रसायन, गावठी दारू व इतर साहित्य पाेलिसांनी जप्त ...
रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे-पाटीलवाडी येथे ५६,१०० रुपयांचे गूळ व नवसागरमिश्रित कुजके रसायन, गावठी दारू व इतर साहित्य पाेलिसांनी जप्त केले. ही कारवाई गुरुवारी सकाळी ७.५० वाजण्याचा सुमारास करण्यात आली. या प्रकरणी सुनील यशवंत कांबळे (४५, रा.मिरजोळे-पाटीलवाडी, रत्नागिरी) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस काॅन्स्टेबल किशोर सावळी यांनी तक्रार दिली. मिरजोळे येथे बेकायदेशीरपणे गावठी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे त्यांनी ही कारवाई करून ५४,४०० रुपयांचे सुमारे २,५०० लीटर गूळ व नवसागरमिश्रित कुजके रसायन, १,१०० रुपयांची २० लीटर गावठी दारू, तसेच अॅल्युमिनियम डेक, लाकडी चाटू व इतर साहित्य असा एकूण ५६,१०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.