चिपळुणात ६८३ पैकी ४७ पाणी नमुने दूषित
By admin | Published: August 15, 2016 12:26 AM2016-08-15T00:26:22+5:302016-08-15T00:26:22+5:30
प्रदूषण वाढले : कामथेतील प्रयोगशाळेचा निष्कर्ष
अडरे : चिपळूण तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत घेण्यात आलेल्या पाणी नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण ६८३ पाणी नमुन्यापैकी ४७ नमुने दूषित आढळून आले आहेत.
दर महिन्याला आरोग्य विभागाकडून चिपळूण तालुक्यातील ९ प्राथमिक केंद्राअंतर्गत पाण्याचे नमुने तपासले जातात. हे नमुने तपासण्यासाठी कामथे येथील प्रयोग शाळेत पाठविल्यानंतर पाणी दूषित आहे किंवा नाही याचा अहवाल आरोग्य विभागाकडे येतो. यामध्ये विहिर, बोअरवेल, नळ पाणी पुरवठा योजना, टाकी हातपंप या साधनांचे नमुने आरोग्य कर्मचारी व जलसुरक्षक गोळा करतात. शिरगाव प्राथमिक केंद्राअंतर्गत ४५ पैकी एकही नमुना दूषित नाही.
रामपूर अंतर्गत कळमुंडी बौध्दवाडी, कापरे अंतर्गत बौध्दवाडी, मधलीवाडी, केतकी बौध्दवाडी, कालुस्ते बुद्रुक नारायणवाडी, खरवते अंतर्गत दहिवली बुद्रुक मुकनाक, रेहेळ भागाडी, गवाणवाडी, बौध्दवाडी, दादर अंतर्गत रिक्टोली गावठण, अडरे अंतर्गत निरबाडे निर्मळवाडी, वेहेळे पाटेकरवाडी, खेर्डी माळेवाडी दातेवाडी बाजारपेठ, गणेशवाडी, चिंचघरी गणेशवाडी सती, खांदाटपाली, भोईवाडी, गवळवाडी, वेहेळे खान मोहल्ला, दळवटणे बागवाडी, कळंबस्ते भुवडवाडी, नवी पेठ, दळवटणे बडदेवाडी, कान्हे लक्ष्मी नारायण, नवीन कोळकेवाडी पाली फाटा, सावर्डे अंतर्गत खेरशेत बोटकेवाडी, टेरव कुंभारवाडी, तळेवाडी, सावर्डेखुर्द कुंभारवाडी, फुरुस अंतर्गत कोसबी घाणेकरवाडी, जोगवाडी, कुडप मोकासवाडी, बौध्दवाडी, हडकणी घागवाडी, अंगणवाडी, डेरवण खुर्द अंगणवाडी, कुटरे अंगणवाडी, चिंचवाडी, गुरववाडी, तळवडे अंगणवाडी, वहाळ अंतर्गत वारेली बौध्दवाडी, काजारेवाडी असे पाणी नमुने दूषित आढळले आहेत. (वार्ताहर)