चिपळुणात दोन महिन्यात वाहन चालकांकडून ३ लाखाचा दंड वसूल

By Admin | Published: March 8, 2017 05:20 PM2017-03-08T17:20:49+5:302017-03-08T17:20:49+5:30

वाहतूक पोलिसांकांकडून कारवाईचा बडगा

In Chhipuna, the penalty of 3 lakh was recovered from the drivers in two months | चिपळुणात दोन महिन्यात वाहन चालकांकडून ३ लाखाचा दंड वसूल

चिपळुणात दोन महिन्यात वाहन चालकांकडून ३ लाखाचा दंड वसूल

googlenewsNext

चिपळुणात दोन महिन्यात वाहन चालकांकडून ३ लाखाचा दंड वसूल

चिपळूण : गेल्या दोन महिन्यात येथील वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या १३३८ वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये वाहतूक पोलिसांनी १३२५ वाहन चालकांकडून २ लाख ७९ हजार ३०० रुपयांचा तर न्यायालयाने १३ वाहन चालकांना २२ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये एकूण ३ लाख १ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे.
जानेवारी व फेबु्रवारी या दोन महिन्यात दुचाकीवर ट्रीपल सीट बसविल्याप्रकरणी १६५ वाहन चालकांकडून ३३ हजार ६०० रुपये, लायसन्सजवळ न बाळगल्याप्रकरणी ५१३ जणांकडून १ लाख २ हजार ८०० रुपये, कागदपत्र जवळ न बाळगल्याप्रकरणी ५५ जणांकडून १० हजार रुपये, लांब मालाची वाहतूकप्रकरणी १८ वाहनांवर ३ हजार ६०० रुपये, रहदारीस अडथळाप्रकरणी ५२ जणांकडून १० हजार ६०० रुपये, वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण प्रकरणी ४५ जणांकडून ९ हजार रुपये, नियमांचा भंगप्रकरणी ४०९ जणांकडून ८२ हजार ८०० रुपये, फ्रंटशिट बसविल्या प्रकरणी एकाकडून २०० रुपये, वाहनाला नंबर प्लेट न बसविल्या प्रकरणी ६ चालकांकडून १ हजार २०० रुपये, गणवेश न घातल्याप्रकरणी २ चालकांकडून ४०० रुपये, हेल्मेट न घातलेल्या एकाकडून ७०० रुपये, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणाऱ्या ७ जणांकडून १ हजार ४०० रुपये, साईड आरसा नसल्याने १२ चालकांकडून १ हजार २०० रुपये, अनुज्ञतीधारक चालक सोबत नसल्याप्रकरणी १६ जणांकडून ७ हजार ९०० रुपये, राँगटर्न मारल्याबद्दल दोघांकडून ४०० रुपये, फॅन्सी नंबरप्लेटप्रकरणी चार चालकांकडून १ हजार ६०० रुपये, १८ वर्षाखालील मुलांनी वाहन चालविल्याप्रकरणी पाच जणांकडून २ हजार ५०० रुपये, चालक परवाना नसल्याने एकाकडून ५०० रुपये, धोकादायकरित्या वाहन चालविणाऱ्यांकडून १२०० रुपये, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह प्रकरणी एकाकडून १ हजार १०० रुपये, याशिवाय अवैध प्रवाशी वाहतूक प्रकरणी न्यायालयाने १२ जणांना २१ हजार ३०० रुपये दंड ठोठावला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In Chhipuna, the penalty of 3 lakh was recovered from the drivers in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.