मुख्यमंत्री उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, वाहतूक व्यवस्थेत करण्यात आला बदल..जाणून घ्या

By अरुण आडिवरेकर | Published: December 15, 2022 05:19 PM2022-12-15T17:19:17+5:302022-12-15T17:42:11+5:30

रत्नागिरीतील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरीत

Chief Minister Eknath Shinde will visit Ratnagiri tomorrow, A change was made in traffic planning | मुख्यमंत्री उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, वाहतूक व्यवस्थेत करण्यात आला बदल..जाणून घ्या

मुख्यमंत्री उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, वाहतूक व्यवस्थेत करण्यात आला बदल..जाणून घ्या

Next

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, शुक्रवारी (दि.१६) रत्नागिरीच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यानिमित्ताने शहरातील वाहन व्यवस्थेबाबत बदल करण्यात आला आहे. त्यासाठी ६ ठिकाण निश्चित करण्यात आली असून, कार्यक्रम ठिकाणाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यांवर वाहने उभी न करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

रत्नागिरीतील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरीत येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पोलिस प्रशासनानेही दौऱ्यासाठी वाहतुकीचे नियोजन केले आहे.

रत्नागिरी व रत्नागिरी बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या वाहन पार्किंगची गैरसोय होऊ नये यासाठी शहरात ६ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. पोलिस दलाने चिन्हांकित केलेल्या पार्किंगच्याच ठिकाणी उभी करावीत, असे आवाहन पोलिस दलाने केले आहे. तसेच नियोजित कार्यक्रम ठिकाणाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यांवर कोणीही वाहने उभी करू नयेत अथवा बेवारस स्थितीमध्ये सोडू नयेत, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.

पार्किंगसाठी नियोजित ठिकाण

कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुल
- आठवडा बाजार मैदान
- पटवर्धन हायस्कूल मैदान
- सर्कस मैदान
तंत्रनिकेतन, शासकीय महाविद्यालय
- थिबा पॅलेस मैदान
- फार्मसी कॉलेज मैदान
तारांगण (माळनाका)
- शिर्के हायस्कूल मैदान

Web Title: Chief Minister Eknath Shinde will visit Ratnagiri tomorrow, A change was made in traffic planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.