दापोलीतील बालिकेवर अत्याचार; जळगावातील वाहकाला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 04:15 PM2019-03-13T16:15:08+5:302019-03-13T16:17:12+5:30

घराच्या अंगणात खेळणाऱ्या अडीच वर्षीय बालिकेला खाऊ देण्याचे आमिष दाखवत घरी बोलावून अत्याचार करणाऱ्या दापोली एसटी आगाराच्या वाहकाला जिल्हा न्यायाधिश-१ व अतिरीक्त सत्र न्यायाधिश ए. एस. आवटे यांनी दोषी ठरवत जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

Child abuse; Lifeguard in Jalgaon | दापोलीतील बालिकेवर अत्याचार; जळगावातील वाहकाला जन्मठेप

दापोलीतील बालिकेवर अत्याचार; जळगावातील वाहकाला जन्मठेप

Next
ठळक मुद्देबालिकेवर अत्याचार; जळगावातील वाहकाला जन्मठेपबालिकेला खाऊ देण्याचे आमिष

खेड : घराच्या अंगणात खेळणाऱ्या अडीच वर्षीय बालिकेला खाऊ देण्याचे आमिष दाखवत घरी बोलावून अत्याचार करणाऱ्या दापोली एसटी आगाराच्या वाहकाला जिल्हा न्यायाधिश-१ व अतिरीक्त सत्र न्यायाधिश ए. एस. आवटे यांनी दोषी ठरवत जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

दापोली शहरातील काळकाई कोंड येथील चाळीमध्ये ही घटना ५ जुलै २०१६ रोजी घडली होती. एस. टी. वाहक सुनिल महाजन (मूळ चहाळी ता. चोपडा, जि. जळगाव) हा दापोली बसस्थानकात वाहक म्हणून कार्यरत होता. तो दापोली काळकाई कोंड येथे भाड्याने खोली घेवून राहत होता. त्याच्याच शेजारी दापोली बसस्थानकात चालक म्हणून कार्यरत असलेल्या त्याच्याच सहकाऱ्याची अडीच वर्षीय चिमुरडी अंगणात अन्य लहान मुलांसमवेत खेळत होती.

सुनिल याने बलिकेला खाऊचे आमिष दाखवत घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला. ही घटना खोलीसमोरच कपडे धुणाऱ्यां मुलीच्या आईने पाहिली व तात्काळ तिला दापोली जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात वाहक महाजन याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून पोलीसांनी त्याला अटक केली.

या प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. आरोपीला जिल्हा न्यायाधिश-१ व अतिरीक्त सत्र न्यायाधिश ए. एस. आवटे यांनी दोषी ठरवत जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात चिमुरडीच्या आईवडीलांची साक्ष व वैद्यकिय अहवाल महत्वपूर्ण ठरले. सरकारी पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. मृणाल जाडकर यांनी काम पाहिले.

Web Title: Child abuse; Lifeguard in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.