कुंबळे शाळेत बाल सारस्वत उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:31 AM2021-03-26T04:31:11+5:302021-03-26T04:31:11+5:30
फोटो ओळी - अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तालुका शाखा मंडणगडतर्फे कुंबळे केंद्र शाळेचे मुख्याध्यापकांचे परिषदेचे तालुका अध्यक्ष ...
फोटो ओळी - अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तालुका शाखा मंडणगडतर्फे कुंबळे केंद्र शाळेचे मुख्याध्यापकांचे परिषदेचे तालुका अध्यक्ष संदीप तोडकर यांनी अभिनंदन केले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तालुका शाखा मंडणगडतर्फे ‘गाव तिथे शाळा, शाळा तिथे बालसारस्वत’ हा पहिला उपक्रम जिल्हा परिषद केंद्रशाळा कुंबळे येथे साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शाळेतील २१ विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभागी होऊन उत्तमरित्या काव्य सादरीकरण केले.
प्रशालेतील शिक्षक संजय करावडे यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेऊन उपक्रम यशस्वी केला. या उपक्रमात मंडणगड तालुका शाखेचे अध्यक्ष संदीप तोडकर, कार्याध्यक्ष अमोल दळवी, उपाध्यक्षा संगीता पंदीरकर, सचिव संजय करावडे, सहसचिव पुंडलिक शिंदे परिषदेच्या वतीने सहभागी झाले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित हाेते.