नैराश्येतून तरूणीची आत्महत्या

By admin | Published: February 26, 2017 12:11 AM2017-02-26T00:11:58+5:302017-02-26T00:11:58+5:30

देवरूख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू

Childhood Suicide From Depression | नैराश्येतून तरूणीची आत्महत्या

नैराश्येतून तरूणीची आत्महत्या

Next

देवरूख : नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्येतून संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली येथे प्रियांका सुभाष इंदुलकर या तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवारी) सकाळी घडली. याबाबत देवरूख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
विघ्रवली (राववाडी) येथील प्रियांका इंदुलकर ही कला शाखेची पदवीधर होती. तिला नोकरी करण्याची प्रबळ इच्छा होती. तिने अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न देखील केले होते. मात्र, या प्रयत्नांना यश न आल्याने प्रियांका ही गेली अनेक दिवस नैराश्येत होती. कधीतरी नोकरी मिळेल, या आशेवर ती होती. पण, तिला नोकरीने कायम हुलकावणीच दिली. या नैराश्येतूनच तिने आज सकाळी राहत्या घरी सकाळी ८.३०च्या सुमारास घराच्या पोटमाळ्यावर नायलॉनच्या ओढणीने गळफास लावून घेतला.
प्रियांका बराचवेळ घरात दिसत नसल्याने तिची शोधाशोध केली असता, ती घराच्या पोटमाळ्यावर लटकताना दिसून आली. तिला तत्काळ खाली उतरवून देवरूख ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. यावेळी डॉ. सुनील दैठणकर यांनी प्रियांकाची तपासणी करुन तिला मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकाँस्टेबल लहू शिवगण करीत आहेत. याबाबत देवरूख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
देवरूख ग्रामीण रूग्णालयाचा भोंगळ कारभार
प्रियांका हिने गळफास घेतल्यानंतर तिच्यावर तत्काळ उपचार होऊन तिचा जीव वाचावा, यासाठी तिला देवरूख रूग्णालयात आणण्यात आले. मात्र, यावेळी वैद्यकीय अधिकारी नेहमीप्रमाणे रजेवर होते. यामुळे प्रियांका हिची तपासणी होऊ शकली नाही. तसेच शवविच्छेदनासाठीदेखील डॉक्टर नसल्याने सायले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून शवविच्छेदन

Web Title: Childhood Suicide From Depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.