किल्ले बनविण्यासाठी मुलांची लगबग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 11:50 PM2019-10-25T23:50:11+5:302019-10-25T23:52:41+5:30

दिवाळी सण आल्याने मुरुड शहरातील व पंचक्रोशी परिसरातील लहान मुलांची किल्ले तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

Children's luggage to build castles | किल्ले बनविण्यासाठी मुलांची लगबग

किल्ले बनविण्यासाठी मुलांची लगबग

googlenewsNext

आगरदांडा : दिवाळी सण आल्याने मुरुड शहरातील व पंचक्रोशी परिसरातील लहान मुलांची किल्ले तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. अंगणांमध्ये किल्ल्याच्या प्रतिकृती बनवताना मग्न झाल्याचे दिसत आहेत.

किल्ल्यावर ठेवण्यासाठी मूर्तीची खरेदी करण्यात येत आहे. आपला किल्ला इतरांपेक्षा वेगळा व्हावा, या हेतूने मुले परिश्रम घेत आहेत. किल्लांची प्रतिकृती तयार करताना मावळे, तोफ, किल्ल्याचे प्रवेशद्वार, शेतकरी, महिला-पुरुष, द्वारपाल, मावळे, लढणारे मावळे यांवर भर दिला जात आहे. दुकानांतही अशा प्रतिकृतीची मागणी आहे.

यावर्षी मुलांकडून विविध प्रकारची खेळणी, तोफ, छत्रपती शिवाजी महाराज, मावळे आदीच्या प्रतिकृतीची मागणी होत आहे. यामध्ये माती व प्लास्टिकच्या अशा दोन प्रकारच्या प्रतिकृती आहेत. प्लास्टिकपेक्षा मातीची प्रतिकृती महाग आहे. मात्र, तरीही मातीच्या प्रतिकृतीची मागणी जास्त आहे. त्यामुळे कमीत कमी किमतीत माती खेळणी व प्रतिकृती उपलब्ध करून देण्यात आल्याने विके्रत्यांनी सांगितले.

Web Title: Children's luggage to build castles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी