चिमुकली अपहरणाचा तपास थंडावला

By admin | Published: March 27, 2016 09:55 PM2016-03-27T21:55:11+5:302016-03-28T00:19:20+5:30

पोलिसांसमोर आव्हान : अपहरणकर्ते दाम्पत्य ठिकाण बदलत असल्याने अडथळा

Chimukli thwarted the investigation of the kidnapping | चिमुकली अपहरणाचा तपास थंडावला

चिमुकली अपहरणाचा तपास थंडावला

Next

लांजा : रात्री आईच्या कुशीत झोपी गेलेल्या सहा महिन्यांच्या तान्हुल्या मुलीचे अपहरण करणारे जोडपे सातत्याने आपले ठिकाण बदलत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या जोडप्याचा शोध घेण्यात लांजा पोलीस अपयशी ठरले
आहेत.सांगली जिल्ह्यातील अजित दस्तगीर जमादार हा ट्रकचालक आपल्या दोन मुली व पत्नीसह आंजणारी येथील शिंदे यांच्या चाळीमध्ये भाड्याने राहात होता. शेजारी राहणारी पूजा, तिचा नवरा प्रसाद, पूजाची आई संगीता तसेच विश्वास नामक एक व्यक्ती यांच्या आधीपासून ४ ते ५ दिवसांपूर्वी राहावयास आली होती. सहा महिन्यांची स्नेहल गोंडस असल्याने तिला खेळवण्यासाठी हे जोडपे घेऊन जात असे. पूजा हिला मूलबाळ नसल्याने पूजाची आई संगीता हिने अजित यांची पत्नी सारिका हिला तुझी लहान मुलगी आम्हाला देशील का? अशी विचारणाही केली असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
दिनांक २३ मार्च रोजी प्रसादने रात्री मद्यपान करून जमादार यांच्या खोलीच्या दरवाजावर लाथा मारल्याने त्यांच्यात भांडण झाले होते. शिमगोत्सव असल्याने चालक मिळत नव्हते. अजित हा बदली चालक म्हणून गोवा येथे ट्रक घेऊन गेला होता. खोलीमध्ये सारीका, तिची अडीच वर्षांची मुलगी आणि सहा महिन्यांची स्नेहल हिला घेऊन ती झोपी गेली होती.
रात्री १ ते ४ दरम्याने प्रसाद व पूजा यांनी स्नेहल हिचे अपहरण केल्याचे सकाळी सारीकाच्या लक्षात आले. तिने आपल्या पतीला घडल्या प्रकाराची माहिती दिली. आंजणारी येथे आल्यानंतर अजित याने प्रसादला फोन केला. त्यावेळी मुलगी माझ्याकडे आहे.
दुपारपर्यंत घरी आणून सोडतो, असे सांगितले. मात्र, सायंकाळपर्यंत मुलगी परत न आल्याने सारीका जमादार हिने लांजा पोलिसात अपहरणाची फिर्याद दिली. अपहरण केल्यानंतर पूजा व प्रसाद या जोडप्याने आंजणारी येथील आपली खोली सोडली. त्याच्या समवेत पूजाची आई संगीता व विश्वास हीदेखील असावेत, असा अंदाज लांजा पोलिसांनी वर्तविला आहे.
गेल्या चार दिवसांपासून लांजा पोलीस पूजा व प्रसाद या जोडप्याचा शोध घेण्यासाठी प्रसाद याच्या मोबाईल टॉवरचे लोकेशन तपासत आहेत. प्रसाद चार दिवसांपासून आपल्या राहण्याच्या जागा सतत बदलत असल्याने लांजा पोलीसदेखील चिंतेत सापडले आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर या ठिकाणचे प्रसादचे लोकेशन दिसत आहे. मात्र, संशयित आरोपींचे फोटो सध्या कोणाकडेही उपलब्ध नसल्याने शोध घेणे अवघड बनले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या सहा महिन्यांच्या तान्हुल्या मुलीचे अपहरण नेमके कशासाठी करण्यात आले, कोणता अंधश्रद्धेचा भाग तर नसावा ना, अशी शंका आता वाटू लागली आहे. लांजा पोलीस अद्यापही या जोडप्याचा कसून शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)



अपहरणकर्त्या जोडप्याचा विविध अंदाजाने शोध घेतला जात आहे. एकीकडे टॉवरचे ठिकाण जाणून घेण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु त्या ठिकाणापर्यंत पोलीस पोहोचण्यापूर्वीच दाम्पत्य ते ठिकाण बदलत असल्याने पोलिसांसमोर अपहरणकर्त्यांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.


अपहरणकर्त्या दाम्पत्याचे छायाचित्रही नसल्याने तपास थंडावला.
अपहरणकर्ते वारंवार ठिकाण बदलत असल्याने मोबाईल टॉवरचे नेमके ठिकाण सापडेना.
गेल्या चार दिवसात कोल्हापूर, रायगड येथे अपहरणकर्त्यांचा वावर.

दाम्पत्याची हुशारी
पोलिसांना मोबाईलवरून टॉवरचे नेमके ठिकाण मिळू नये, यासाठीच दाम्पत्य सावधगिरीने ठिकाण वारंवार बदलत असल्याचा पोलिसांचा कयास आहे.

Web Title: Chimukli thwarted the investigation of the kidnapping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.