चिपळुणात ३५ गावचे पाणी दूषित
By Admin | Published: March 4, 2015 09:40 PM2015-03-04T21:40:21+5:302015-03-04T23:39:36+5:30
अडरे आरोग्य केंद्राअंतर्गत येथील ४ पाणी नमुने दूषित आहेत, यामध्ये अनारी बौद्धवाडी, खेर्डी देऊळवाडी, शिगवणवाडी व बौद्धवाडी.
अडरे : तालुक्यातील कामथे प्रयोग शाळेत तपासलेल्या ४१३ पाणी नमुन्यांपैकी फक्त ३५ नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोग्य विभागाकडून महिन्याला आरोग्य केंद्राअंतर्गत ग्रामीण भागातील पाण्याच्या स्रोतांचे नमुने तपासले जातात. फेब्रुवारीत ४१३ नमुने घेऊन कामथे प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये ३५ ठिकाणांचे पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले आहे. अडरे आरोग्य केंद्राअंतर्गत येथील ४ पाणी नमुने दूषित आहेत, यामध्ये अनारी बौद्धवाडी, खेर्डी देऊळवाडी, शिगवणवाडी व बौद्धवाडी. दादर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ४ नमुने दूषित आहेत, यामध्ये पेढांबे उगवतवाडी, कादवड बौद्धवाडी, ओवळी गावठण, नांदिवसे गावठण, शिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत पोफळीनाका. खरवते प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ७ नमुने दूषित आहेत, यामध्ये दहिवली बुद्रुक बौद्धवाडी, कोंढे करंजकरवाडी, बौद्धवाडी, रेहेळेगाव, रेहेळेवाडी, रेहेळे कान्हेरेवाडी, वैजी फणसाचीचाळ. वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ७ नमुने दूषित, यामध्ये ढाकमोली पाष्टेवाडी, मुर्तवडे देववाडी, धनगरवाडी, देववाडी, मधलीवाडी, कुटलवाडी, ढाकमोली पाटवाडी. रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ३ नमूने दूषित आहेत, यामध्ये रामपूर जोधगाव बौद्धवाडी, जोधगाव बौद्धवाडी, तळेचीवाडी. फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ५ नमुने दूषित आहेत, तळवडे गुरववाडी, बौद्धवाडी, दुर्गेवाडी, कोसबी गोताडवाडी, नांदगाव ढमालवाडी, दुर्गेवाडी कुंभार्ली. कापरे आरोग्य केंद्राअंतर्गत ४ नमुने दूषित आहेत. गोंधळे देऊळवाडी, करंबेळे, मजरेकोंढर नवरतवाडी, हनुमान गाव भोसलेवाडी. सावर्डे आरोग्य केंद्राअंतर्गत ४ नमुने दूषित आहेत, कामथेखुर्द हरेकरवाडी, कदमवाडी, आगवे गुरववाडी, आगवे बौद्धवाडीचा समावेश आहे. (वार्ताहर)