चिपळुणात ७० सदनिकांनी सोसायटी कचरामुक्त केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 07:34 PM2021-01-01T19:34:11+5:302021-01-01T19:36:23+5:30

Garbage Disposal Issue Ratnagiri- चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने शहरातील किरणविहार संकुल या सोसायटीतील ७० सदनिकांमध्ये गतवर्षीपासून कचरामुक्त उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाला मोठे यश आले असून, आता शहरातील दहा गृहनिर्माण सोसायटींमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कचरामुक्त सदनिकाधारकांना नगर परिषदेकडून घरपट्टीत ५ टक्के सूट दिली जात आहे.

In Chiplun, 70 flats cleared the society of garbage | चिपळुणात ७० सदनिकांनी सोसायटी कचरामुक्त केली

चिपळुणात ७० सदनिकांनी सोसायटी कचरामुक्त केली

googlenewsNext
ठळक मुद्देचिपळुणात ७० सदनिकांनी सोसायटी कचरामुक्त केली नगर परिषदेने घरपट्टीत पाच टक्के सवलत दिली

 संदीप बांद्रे

चिपळूण : येथील सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने शहरातील किरणविहार संकुल या सोसायटीतील ७० सदनिकांमध्ये गतवर्षीपासून कचरामुक्त उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाला मोठे यश आले असून, आता शहरातील दहा गृहनिर्माण सोसायटींमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कचरामुक्त सदनिकाधारकांना नगर परिषदेकडून घरपट्टीत ५ टक्के सूट दिली जात आहे.

यावर्षी संस्थेने या उपक्रमाचा विस्तार म्हणून चिपळूणमधील प्रथम येणाऱ्या दहा सोसायट्या तसेच १०० लहान-मोठी कुटुंबे कचरामुक्त करण्याचा संकल्प संस्थेने सोडला आहे. हा प्रकल्प डाऊ केमिकल इंटरनॅशनल व सह्याद्री निसर्ग मित्र यांच्या संयुक्त प्रयत्नातून व चिपळूण नगर परिषदेच्या सहकार्याने होणार आहे.

या दहा सोसायट्यांमधून ओला कचरा व सुका कचरा घरातच वेगवेगळा करून स्वतंत्रपणे दिला जाणार आहे. सोसायटीमध्ये ओल्या कचऱ्याचे उत्तम खत बनवले जाईल व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून तो रिसायकलिंगकरिता पाठवला जाईल. यासाठी लागणारी साधनसामुग्री प्रोत्साहनार्थ पुरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रकल्पात पुढे कायमस्वरूपी तांत्रिक मदत पुरविण्यात येणार आहे. ज्या सोसायट्या व घरे हे व्यवस्थापन यशस्वी करतील, त्यांना घरपट्टीमध्ये पाच टक्के सूट मिळणार आहे. गतवर्षी सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने चिपळूण नगर परिषदेच्या मार्गदर्शनाखाली किरणविहार संकुल ही ७० सदनिकांची सोसायटी यशस्वीपणे कचरामुक्त केली व त्यातील सदनिकाधारकांना पालिकेने घरपट्टीमध्ये सूटही दिली आहे.

भारतात दरवर्षी ९३ लाख टन कचरा तयार होतो. प्रत्येक माणूस दिवसाला ०.१४ ते ०.६४ ग्राम कचरा तयार करतो. या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्याने कचरा ही राष्ट्रीय समस्या बनली आहे. आपल्या परिने अल्प प्रमाणात का होईना ही समस्या सोडविण्याचा सह्याद्री निसर्ग मित्र प्रयत्न करत आहे. यासाठी जनजागृतीपर माहितीपट बनविण्यात येणार असून, हा माहितीपट संपूर्ण चिपळूणमध्ये दाखवला जाणार आहे.

ॲपचीही घेतली मदत
या कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, अँड्रॉईड ॲप बनवले जाणार आहे. यातून रियल टाईम डाटा मॅनेजमेंट केली जाणार आहे. जनजागृतीसाठी या ॲपचा वापर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून कचरामुक्तीचे महत्त्व सांगितले जाणार आहे.

'क्लीन होम मिनिस्टर'ची निवड
या कार्यक्रमातून संपूर्ण चिपळूणमध्ये स्वच्छ गृहमंत्री (क्लीन होम मिनिस्टर) स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कामात व्यक्ती, संस्था, युवकांना सहभागी केले जाणार आहे. कचरामुक्त सोसायटी व घर प्रकल्पात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सोसायटी पदाधिकारी व नागरिकांनी संस्थेकडे आपली नोंदणी करावी. याकरिता उदय पंडित, भाऊ काटदरे, राम मोने यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: In Chiplun, 70 flats cleared the society of garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.