चिपळूणात घरफोड्या करणारा एकजण अटकेत

By admin | Published: March 16, 2017 07:07 PM2017-03-16T19:07:50+5:302017-03-16T19:07:50+5:30

सापळा रचून अटक

Chiplun burglar hanging one | चिपळूणात घरफोड्या करणारा एकजण अटकेत

चिपळूणात घरफोड्या करणारा एकजण अटकेत

Next

आॅनलाईन लोकमत
गुहागर : गेल्या दोन वर्षात गुहागर तालुक्यात शृंगारतळी ते शीर दरम्यान वेगवेगळ्या ठिकाण पाच घरफोड्या करणाऱ्या चोरट्यास गुहागर पोलीस व स्थानिक गुन्ह अन्वेषण विभागाने सापळा रचून अटक केली आहे. पर्शुराम विलास शेंडगे (३१) असे त्याचे नाव आहे. शेंडगे याच्या अटकेमुळे आणखी काही घरफोड्याची उकल होण्याची शक्यता आहे.
पर्शुराम शेंडगे हा गेली काही वर्षे चिपळूण पाग व देवघर येथे कुटुंबासह राहाा होता. त्याचे मूळगाव (हतनूर, ता.तासगाव, जि. सांगली) येथे आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांन दिलेल्या माहितीनुसार मुंबईम्ध्ये तुर्भे, कोपरखैरण, नेरुळ, वर्सोवा, अंंधेरी अशा विविध ठिकाणी ४० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. गेली काही वर्षे त्याचे वास्तव्य चिपळूण पाग ा देवघर येथे होते. शृंगारतळी ते शीर दरम्यान पाच घरफोड्यांची कबुली पोलीस ापासात दिली असून यामध्ये तब्बल ८ लाख ३५ हाार कमतीच्या सोने चांदीचे दागिने तसेच रोख रकमेपैकी तब्बल १ लाख ३० हजारापर्यंतचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. सध्या तरी पाच गुन्ह्यांची कबुली दिली असली तरी चिपळूण व इतर परिसरतील आणखी घरफोड्यांची उकल पुढील तपासामध्ये होंईल असे पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांनी सांगितले. पर्शुराम शेंडगे याच्यावर पोलिसांचा संशय होता. काही दिवस तो फरार असल्याने १० मार्चला गणेशखिंड येथून तो जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुहागर पोलीस पथकातील पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक दीपक कदम, बी.एम. जाधव,संजय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पवार, प्प्रकाश मोरे, संदीप तळेकर, राजू कांबळे तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे आर.एन. फडणवीस, बी.एम. तडवी यांनी सापळा रचून दुपारी १२ वाजाा पर्शुराम शेंडगे याला ताब्यात ोतले असता त्याच्या बॅगेमध्ये दोन कटावण्या, पकड, वायर आदी घरफोडीसाठी आवश्यक साहित्य तसेच विविध ठिकाणी चोरलेले सोन्या चांदीचे दागिन्यांच्या पावत्या मिळून आल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १७ आॅक्टोबर २०१४ रोजी दत्ताराम भागोजी आंबवकर शृंगारतळी यांच्या घरुन १ लाख २५ हजार किमतीचे दागिने चोरले. ४ जून २०१६ रोज विजयकुमार रामकृष्णकाटघरे शीर यांच्या मंदिरातून देवीच्या अंगावरील ३८ हजार ७९२ किमतीचे दगिने चोरले.
५ जून २०१६ रोजी रुस्तुम मौला मुल्ला (शीर) आंबवकरवाडी येथून ३४ हजार ८०० किमतीचे दागिने चोरले. १७ जानेवारी २०१७ रोजी मनोहर वसंत गुहागरकर (कोतळूक) यांच्या घरुन ४२ हजार ४० रु. किमतीचे सोना चांदीच्यावस्तू चोरल्या. तसेच ३० जानेवारी २०१७ रोजी विद्या विद्याधर नारकर (शृंगारतळी वेळंब रोड) यांच्या बंद घरातून १ लाख ७३हजार किमतीचे ६० हजाररोख रक्कम व दागिने चोरले. विद्याधर नारकर हे पोलीसमध्ये चालक आहेत. चोरी झाली तेव्हा अन्य पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सध्या ते गुहागर पोलीस ठाण्यात र्काारत आहेत. या चोरीमधील तब्बल १ लाख ३० हजार किमतीचा मुद्दोाल हस्तगत करण्यात यश आल्याचे माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Chiplun burglar hanging one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.