Chiplun Flood: १६ ट्रक अन् एसटी बस भरून मदत साहित्य घेऊन खासदार श्रीकांत शिंदे पोहोचले थेट कोकणात! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 06:39 PM2021-07-31T18:39:49+5:302021-07-31T18:41:08+5:30

अन्नाधान्य, चादरी, चटई, कपडे, भांडी, शेगडी, पिण्याचे पाण्याचे वाटप

Chiplun Flood MP Shrikant Shinde helping flood affected peoples in Konkan | Chiplun Flood: १६ ट्रक अन् एसटी बस भरून मदत साहित्य घेऊन खासदार श्रीकांत शिंदे पोहोचले थेट कोकणात! 

Chiplun Flood: १६ ट्रक अन् एसटी बस भरून मदत साहित्य घेऊन खासदार श्रीकांत शिंदे पोहोचले थेट कोकणात! 

googlenewsNext

कल्याण-जोरदार अतिवृष्टीने कोकणाला जबरदस्त तडाखा बसला आहे. अनेकांचे मृत्यू झाले आहेत. तर अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहे. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे थेट कोकणात पोहचले. ही मदत देण्यासाठी डोंबिवली शिवसेना शहर शाखेने पुढाकार घेतला आहे. 

खासदारांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी कोकणातील पूरग्रस्त महाड, खेड, चिपळूण या भागातील नागरीकांना अन्नाधान्य, चादरी, चटई, कपडे, भांडी, शेगडी, पिण्याचे पाण्याचे वाटप केले. 16 ट्रक आणि एक एसटी महामंडळाची बस मदत  साहित्य घेऊन 30 जुलै रोजीच कोकणात रवाना झाली होती. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे, मा. नगरसेवक दिपेश म्हात्ने, विश्वनाथ राणो, राजेश कदम, मा. सरपंच खोणी हनुमान ठोंबरे, उल्हासनगर मनपा नगरसेवक अरु ण आशान, व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पूराचे पाणी ओसरल्यावर पूरग्रस्त भागात वाहून आलेला कचरा, गाळ, घाण जमा होणो आण ियामुळे विषाणूंचा प्रसार होऊन साथीचे आजार वाढण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन तातडीने शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्नी आणी ठाणो जिल्हा पालकमंत्नी एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणो महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी आणि टीडीआरएफ जवानांच्या मदतीने कोकणातील महाड शहर स्वच्छ आणि निर्जंतूकीकरणाचे करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु  आहे. आज खासदार शिंदे यांचे सह अन्य स्थानिक प्रशासनासह महाड येथील विविध पूरग्रस्त भागांना भेट देत तेथील नागरिकांशी संवाद साधत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच शहरात सुरु  स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. त्याचबरोबर महाड येथील कोठेश्वरी तळे, प्रभात कॉलनी येथील पूरग्रस्ताना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाजवळ डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने पूरग्रस्त बांधवांकरिता आरोग्य शिबीर सुरु  असून या शिबिराला भेट देत तेथील डॉक्टरांशी संवाद साधत नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या शिबिरात आरोग्य तपासणी करु न घेण्याचे, आवाहन खासदार  शिंदे यांनी याप्रसंगी केले. या मोफत आरोग्य शिबिरात आरोग्य तपासणी नंतर रु ग्णांना लागणारी औषधे मोफत दिली जात आहेत.

Web Title: Chiplun Flood MP Shrikant Shinde helping flood affected peoples in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.