चिपळूण, खेडमध्ये मिळकत उतारे, नकाशे पुरविण्यासाठी पथक तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:32 AM2021-07-27T04:32:58+5:302021-07-27T04:32:58+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यातील चिपळूण व खेड तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण शहर व खेड शहर येथील बराचसा भाग ...

Chiplun, income transfers in Khed, team ready to provide maps | चिपळूण, खेडमध्ये मिळकत उतारे, नकाशे पुरविण्यासाठी पथक तयार

चिपळूण, खेडमध्ये मिळकत उतारे, नकाशे पुरविण्यासाठी पथक तयार

Next

रत्नागिरी : जिल्ह्यातील चिपळूण व खेड तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण शहर व खेड शहर येथील बराचसा भाग पुराच्या पाण्याखाली आला हाेता. पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना त्यांच्या मिळकतीचे उतारे व नकाशे तसेच शेतजमिनीचे नकाशे यांच्या नक्कल प्रती मागणी अर्जाप्रमाणे तत्काळ पुरविण्याकरिता पथक तयार करण्यात आले आहे. यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली आहे.

चिपळूण येथील पथकाचे प्रमुख म्हणून चिपळूण येथील भूमी अभिलेखचे उपअधीक्षक कृष्णा सोपान शिंदे (९८९०७५०७९५) हे आहेत. त्यांच्यासाेबत सहाय्यक कर्मचारी म्हणून शिरस्तेदार भगवान के. सांबरे (९७६५६७६९३५), निमतानदार दीपक एस. गजापकर (७७७६९७३०५९), प्रतिलिपी लिपीक राम वसंत राठोड (८८८८००८११८) हे काम पाहणार आहेत.

तसेच खेडसाठी पथकप्रमुख म्हणून खेडचे उपअधीक्षक विजय पांडुरंग मयेकर हे काम पाहणार आहेत. त्यांच्यासाेबत निमतानदार वसंत व. पाटोळे (९७६५६७६९३५), भूकरमापक माधव एस. वानोळे (७०६६८००८५०), आवक-जावक लिपिक सायली धोत्रे (७२७६४६०६६८) यांचा समावेश आहे.

संपर्कासाठी चिपळूण - dyslrchiplun_ratnagiri@yahoo.in, dyslrchiplun.ratnagiri@gmail.com तसेच खेडसाठी dyslrkhed_ratnagiri@yahoo.in, dyslrkhed.ratnagiri@gmail.com हे ई-मेल आयडी देण्यात आले आहेत.

Web Title: Chiplun, income transfers in Khed, team ready to provide maps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.