चिपळूण नगर परिषद : स्वीकृत नगरसेवकपदी भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 04:17 PM2018-07-11T16:17:21+5:302018-07-11T16:22:17+5:30
चिपळूण येथील नगर परिषदेचे काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक हारुण घारे यांनी राजीनामा दिल्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदासाठी नगर परिषदेत निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये स्वीकृत नगरसेवकपदी परिमल भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.
चिपळूण : येथील नगर परिषदेचे काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक हारुण घारे यांनी राजीनामा दिल्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदासाठी नगर परिषदेत निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये स्वीकृत नगरसेवकपदी परिमल भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.
चिपळूण नगर परिषदेच्या श्रावणशेठ सभागृहामध्ये स्वीकृत नगरसेवक रिक्त पदाच्या निवडीसाठी विशेष सभा झाली. यावेळी कोणाचाही अर्ज आला नसल्याने स्वीकृत नगरसेवकपदी भोसले यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, गटनेत्या जयश्री चितळे, काँग्रेसचे गटनेते कबीर काद्री, नगरसेवक शशिकांत मोदी, उमेश सकपाळ, मोहन मिरगल, भगवान बुरटे, मनोज शिंदे, सई चव्हाण, उपस्थित होते.
स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर भोसले म्हणाले की, ही निवडणूक सोपी असली तरी यापूर्वी मी प्रभागातून दोनदा निवडणूक लढवली होती. यामध्ये मला अपयश आले होते. आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या आशीर्वादानेच मला संधी मिळाली असून, शहराच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करेन, असे सांगितले.
यावेळी भोसले यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्योजक नासीर खोत, कुंदन खातू, प्रफुल्ल पिसे, स्वाभिमान रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.