चिपळूण राष्ट्रवादीची जम्बो शहर कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:32 AM2021-05-21T04:32:28+5:302021-05-21T04:32:28+5:30
चिपळूण : आगामी नगर परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीने शहरातील ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यातूनच गेल्या वर्षभरापासून ...
चिपळूण : आगामी नगर परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीने शहरातील ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यातूनच गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे रखडलेली शहर कार्यकारिणी आता जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या या जम्बो कार्यकारिणीमध्ये तब्बल ४६ जणांचा समावेश आहे. त्याचबरोबर पार्लमेंटरी बोर्डचीही स्थापना करण्यात आली आहे.
चिपळूण नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता बहुमतात आणण्याच्यादृष्टीने शहराची कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी यांनी सांगितले. कापडी यांनी जाहीर केलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - उपाध्यक्ष भाई गुढेकर, विनायक पवार, सचिन पाटेकर, खालीद दाभोळकर, संदीप चिपळूणकर, सलीम पालोजी, राजेश कदम, दिनेश शिंदे, सचिव - मनोज जाधव, सहसचिव - कादीर मुकादम, सल्लागार - सुचय रेडीज, शिरीष काटकर, खजिनदार - बिलाल पालकर, सहखजिनदार - रमेश खळे, सरचिटणीस - आदिती देशपांडे, चिटणीस - सोनाली मिर्लेकर, कार्यकारिणी सदस्य - प्रसाद चिपळूणकर, सतीश खेडेकर, राजन कुडाळकर, यासिन दळवी, निहार गुढेकर, सुनील रेडीज, समीर जानवलकर, डॉ. पाते, प्रमोद लोटेकर, जफर कटमाले, शकील चौगुले, किसन चिपळूणकर, राजन कोकाटे, अशपाक मेमन, अशपाक कास्कर, सुरेश कदम, परेश तांबट, विलास लाड, विजय गांधी, महेश शिंदे, ताजुद्दीन राजीवटे, शरीफ वांगडे, अफजल कच्छी, बावा शिंदे, मनोहर खेडेकर, संजय तांबडे, विजय शिगवण, प्रणव सुर्वे, सोशल मीडिया अध्यक्ष - सचिन साडविलकर, विधानसभा सोशल मीडिया अध्यक्ष - सचिन पालशेतकर, आदींचा समावेश आहे.
.............................
पार्लमेंटरी बोर्ड स्थापन
नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्लमेंटरी बोर्ड स्थापन करण्यात आले असून, त्यामध्ये आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, सुचय रेडीज, शौकत मुकादम, जयंद्रथ खताते, दादा साळवी, शिरीष काटकर, अजमल पटेल, सावित्री होमकळस, सुरेश चिपळूणकर, मिलिंद कापडी, आदींचा समावेश आहे.