‘लाेकमत'च्या रक्तदान शिबिराला चिपळूणकरांचा उत्तम प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:21 AM2021-07-08T04:21:52+5:302021-07-08T04:21:52+5:30

चिपळूण : ‘लोकमत’ आणि रोटरी क्लब ऑफ चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने येथे बुधवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला चिपळूणकरांचा उत्तम ...

Chiplunkar's great response to the blood donation camp of 'Lakmat' | ‘लाेकमत'च्या रक्तदान शिबिराला चिपळूणकरांचा उत्तम प्रतिसाद

‘लाेकमत'च्या रक्तदान शिबिराला चिपळूणकरांचा उत्तम प्रतिसाद

googlenewsNext

चिपळूण : ‘लोकमत’ आणि रोटरी क्लब ऑफ चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने येथे बुधवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला चिपळूणकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. विविध क्षेत्रातील नागरिकांनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या रक्तदान महायज्ञात सहभाग नोंदवला.

कोरोनाची परिस्थिती व रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन ‘लोकमत’ने संस्थापक संपादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर २ ते १५ जुलैदरम्यान रक्तदानाचा महायज्ञ आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या माध्यमातून येथील विवेकानंद सभागृह येथे शिबिर घेण्यात आले.

या शिबिराच्या प्रारंभी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या प्रतिमेला रोटरी क्लब ऑफ चिपळूणचे अध्यक्ष प्रसाद सागवेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी रोटरीचे डॉ. चिनार खातू, विनोद घुमरे, पराग बांद्रे, डॉ. निनाद साडविलकर, शार्दुल जाधव, राजेश ओतरी, शैलेंद्र सावंत, रमण डांगे, लोकमतचे मनोज मुळ्ये, तन्मय दाते, प्रवीण वायंगणकर, राजेश कांबळे, संतोष जाधव, संजय सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चव्हाण उपस्थित होते. ‘लोकमत’च्या या समाजोपयोगी उपक्रमाला पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, सामाजिक कार्यकर्ते इनायत मुकादम, चिपळूण अर्बन बँकेचे माजी संचालक विलास चिपळूणकर, फैरोजा मोडक, नगर परिषद प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, शिवसेना शाखाप्रमुख भैया कदम, काँग्रेसचे फैसल पिलपिले, अरुण उपाहारगृहाचे मालक राजेश आपटे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

-------------------------------

रक्तदात्यांचे रक्तदान

नगर परिषद आरोग्य सभापती शशिकांत मोदी, रोटरी क्लब अध्यक्ष प्रसाद सागवेकर, भाजपचे पदाधिकारी राकेश घोरपडे, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी अमित कासार, भाविक कदम, राजेंद्र गुजर, ओमकार महाडिक, उमेश महाडिक, आतिष खेडेकर, सुमित वाजे, अमित गुडेकर, योगेश मोरे, कृषी विभागाचे राजेश फडणीस, नगर परिषद आरोग्य निरीक्षक महेश जाधव, निरंकारी मंडळाचे रामप्रकाश बर्मा, महेश पाटणकर, नगर परिषद कर्मचारी सचिन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते कुमारगौरव वायदंडे, तसेच राकेश कळंबटे, अनिल सुर्वे, प्रतीक ओक, संतोष जाधव, राजेश चिंगळे, सुरेन मालशे, किरण महाडिक, रोहित मसवडे, जियाद चिकटे, यासीन खतीब, सचिन भुरण, गणेश वैद्य, संदीप बांद्रे आदी रक्तदात्यांनी रक्तदान केले.

---------------------

चिपळुणात आयोजित रक्तदान शिबिराच्या प्रारंभी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या प्रतिमेला रोटरी क्लब ऑफ चिपळूणचे अध्यक्ष प्रसाद सागवेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केले. यावेळी रोटरीचे डॉ. चिनार खातू, विनोद घुमरे, पराग बांद्रे, डॉ. निनाद साडविलकर, मनोज मुळे, संजय सुर्वे, राकेश कळंबटे, संदीप बांद्रे, राजेश कांबळे उपस्थित होते.

Web Title: Chiplunkar's great response to the blood donation camp of 'Lakmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.