वीर जवानांच्या शौर्याला चिपळूणकरांचा सलाम-- - आजी-माजी सैनिक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 05:15 PM2020-02-12T17:15:40+5:302020-02-12T17:16:15+5:30

२००७ मध्ये सेना दलात वैद्यकीय सेवा देणाऱ्या फोर्सच्या मेजर शिवप्रिया यांनी त्यांना अशाही स्थितीत जीवनाचा जोडीदार म्हणून निवडले. कमांडो श्यामराज यांच्याशी विवाह करण्याचे निश्चित झाल्यावर अशाच स्थितीत हा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला.

Chiplunkar's salute to the bravery of the brave soldiers | वीर जवानांच्या शौर्याला चिपळूणकरांचा सलाम-- - आजी-माजी सैनिक एकवटले

वीर जवानांच्या शौर्याला चिपळूणकरांचा सलाम-- - आजी-माजी सैनिक एकवटले

googlenewsNext
ठळक मुद्दे - २१ पॅरा कमांडो विशेष दलाचा वर्धापनदिन - शहिदांच्या कुटुंबियांचा सन्मान

संजय सुर्वे।

शिरगाव : सैन्य दलातील प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर आलेले प्रसंग व त्या परिस्थितीत कुटुंबियांकडून मिळालेली अजोड साथ या सर्व आठवणींना उजाळा देत देशाच्या कानाकोपºयात कार्यरत असलेले आजी-माजी सैनिकांचे सुमारे दीडशेहून अधिक कुटुंबीय या आकस्मिक भेटीने सुखाहून गेले. २१ पॅरा कमांडो विशेष दलाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे चिपळूण येथे आयोजन करण्यात आले होते.

चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील स्वामी मंगल कार्यालयात २१ पॅरा कमांडो विशेष दलाचा ३४वा वर्धापन दिन मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला देशभरातून आलेल्या सैनिक कुटुंबियांनी शहिदांना आदरांजली वाहत कार्यक्रमाची सुरुवात केली. शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या मातोश्री, शौर्यचक्रप्राप्त कमांडो मधुसूदन सुर्वे, विकलांग सैनिक शामराज युवी, सुभेदार मधुकर पाटील, शहीद सैनिक सुधाकर भाट यांच्या पत्नी, १९७१चे वीरचक्रप्राप्त व चिपळूणचे कॅप्टन अर्जुन जाधव यांच्या कुटुंबियांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

श्यामराज युवी यांची अनोखी झुंज...
कमरेच्या खाली विकलांग असलेले पॅरा कमांडो श्यामराज युवी यांचा जीवनप्रवास अंगावर २००२मध्ये ‘ऑपरेशन पराक्रम’वेळी बर्फाळ टेकडीवर कर्तव्य बजावताना त्यांची गाडी दरीत कोसळली व ते बाहेर फेकले गेले. झाडात अडकले मात्र कमरेखालील भागाच्या संवेदना गेल्या. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांच्या पुढील आयुष्याची चिंता सर्वांनाच वाटत होती. २००७ मध्ये सेना दलात वैद्यकीय सेवा देणाऱ्या फोर्सच्या मेजर शिवप्रिया यांनी त्यांना अशाही स्थितीत जीवनाचा जोडीदार म्हणून निवडले. कमांडो श्यामराज यांच्याशी विवाह करण्याचे निश्चित झाल्यावर अशाच स्थितीत हा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी तत्कालिन राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. आपला जीवनप्रवास खडतर असला तरी सैनिक परिवारातच सुख मानणारे श्यामराज कुठेही कार्यक्रम असला तरी हजेरी लावतात. याबाबत अनेकांनी त्यांचे कौतुक केले.

‘लोकमत’च्या वृत्तानंतर घेतली सत्कारमूर्तींची भेट
राज्यातील वीरमाता, पत्नी चिपळुणात येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले. हे वृत्त वाचून जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा निर्मला जाधव, मालती पवार, सीमा चाळके, अंजली कदम, दीप्ती सावंत-देसाई, जिजाऊ स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष महेंद्र पालांडे, सांजसोबत प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अपर्णा बेलोसे-कदम यांनी सर्व सत्कारमूर्तींची भेट घेऊन सन्मानित केले.

Web Title: Chiplunkar's salute to the bravery of the brave soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.