वरवेलीत चिरेखाणी बंद होणार

By admin | Published: May 22, 2016 12:43 AM2016-05-22T00:43:21+5:302016-05-22T00:47:20+5:30

गुहागर तालुका : स्ट्रोनक्रशरवरही बंदी घालण्याचा ग्रामसभेचा ठराव

The chirakhani will be closed in the Vareli | वरवेलीत चिरेखाणी बंद होणार

वरवेलीत चिरेखाणी बंद होणार

Next

असगोली : गुहागर तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायतीची तहकूब सभा नुकतीच जिल्हा परिषद वरवेली शाळा क्र.१ मध्ये घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चिरेखाणी व स्टोनक्रशर कायमस्वरुपी बंद करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच शशिकांत जाधव होते.
या संबंधीच्या ठरावाची प्रत तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. स्टोनक्रशरपासून धुळीचा त्रास येथील काजू बागायतदारांना होत असल्याची तक्रार अनेकदा ग्रामसभांमधून करण्यात आली. या ग्रामसभेमध्येही शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार केली. क्रशरचा त्रास शेतकऱ्यांना होत असेल तर तोही कायमस्वरुपी बंद करण्यात यावा असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. चिरेखाण मालकांशी वेळोवेळी ग्रामपंचायतीने चर्चा तसेच नियम पाळण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, या सुचनांचे योग्य पालन चिरेखाण मालकांकडून झाले नसल्याची प्रतिक्रिया ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
ग्रामसेविका कल्याणी करंदेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. यावेळी त्यातील काही मुद्द्यांची ग्रामपंचायतीने कार्यवाही केली नसल्याची सूचना ग्रामस्थांनी मांडली. त्यानंतर उपसरपंच शशिकांत जाधव यांनी मागील ठरावाची अंमलबजावणी ग्रामपंचायतीने केली असल्याचे स्पष्ट करुन चिरेखाण व्यावसायिकांसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करताना काही जमीन मालक जागा देत नसल्याने पर्यायी रस्त्याची व्यवस्था झाली नसल्याचे स्पष्ट केले. बौद्धवाडी स्मशानभूमीच्या जागेसंदर्भात जमीन मालक व बौद्धवाडी ग्रामस्थ तसेच गावातील ग्रामस्थ पुन्हा एकत्र येऊन सामोपचाराने हा प्रश्न सोडवणार असल्याचेही यावेळी जाधव यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचायत इमारत बांधकामाबाबत ग्रामसेविका करंदेकर यांना कामाचा आढावा घेतला. वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पाणलोट विकासकामांची चौकशी तसेच पाणलोटला देण्यात आलेल्या साहित्याची योग्य ती चौकशी करण्यात यावी, असा ठरावही करण्यात आला. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता चरखोदाई केली गेल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. (वार्ताहर)

Web Title: The chirakhani will be closed in the Vareli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.