रत्नागिरीत नाताळनिमित्त चर्चवर रोषणाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 04:50 PM2019-12-25T16:50:06+5:302019-12-25T16:53:51+5:30
प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मसोहळा ख्रिश्चन बांधव दरवर्षी श्रध्देने व पारंपरिक पध्दतीने साजरा करतात. सन १८२६च्या आधीपासून रत्नागिरी बाजारपेठेतील मिलाग्रिस चर्चला इतिहास आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही प्रभू येशू ख्रिस्त जन्मसोहळा बुधवार, दि. २५ रोजी चर्चमध्ये साजरा करण्यात आला. त्यामुळे मिलाग्रिस चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिवाय चर्चच्या आवारात मेरी ख्रिसमस शुभेच्छा देणारी चांदणी लावण्यात आली होती.
रत्नागिरी : प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मसोहळा ख्रिश्चन बांधव दरवर्षी श्रध्देने व पारंपरिक पध्दतीने साजरा करतात. सन १८२६च्या आधीपासून रत्नागिरी बाजारपेठेतील मिलाग्रिस चर्चला इतिहास आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही प्रभू येशू ख्रिस्त जन्मसोहळा बुधवार, दि. २५ रोजी चर्चमध्ये साजरा करण्यात आला. त्यामुळे मिलाग्रिस चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिवाय चर्चच्या आवारात मेरी ख्रिसमस शुभेच्छा देणारी चांदणी लावण्यात आली होती.
मंगळवारी रात्री १२ वाजता प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. बुधवारी सकाळी चर्चमध्ये प्रार्थना आयोजित करण्यात आली. सायंकाळी महाप्रार्थना, स्नेहसंमेलन, फनीगेम्सचे आयोजन करण्यात आले होते.
नाताळनिमित्त चर्चची रंगरंगोटी करून आकर्षक सजावट करण्यात आली होती. चर्चबाहेर प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदेखावा सादर करणारी झोपडी दाखविण्यात आली होती.
नाताळनिमित्ताने सांताक्लॉजचे मुखवटे, भेटवस्तू, केक, विविध प्रकारच्या मिठाई, पेस्ट्रीज, चॉकलेट्स यांना विशेष मागणी होती. अनेक ठिकाणी दुकानांमध्ये सांताक्लॉजचा पोशाख परिधान करून मुलांना चॉकलेट वाटण्यात आली.