तिवरे पुनर्वसतील ३३ घरं सिडको उभारणार; सामंत यांच्या बैठकीत निर्णय
By संदीप बांद्रे | Published: August 26, 2023 01:41 PM2023-08-26T13:41:20+5:302023-08-26T13:41:29+5:30
सिडकोमार्फत तात्काळ सर्व्हे सुरु
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामत यांनी आज चिपळूण येथील तिवरे धरणग्रस्त कुटूंबियांच्या घरासंदर्भात बैठक आयोजित केली होती. यामध्ये तिवरे धरणग्रस्त वासियांना ३३ नवीन घरे बांधून देण्यासाठी सिडकोने पुढाकार घेतला असुन डिसेंबर पर्यंत ही घरी पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत.
तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर येथील घरांची बाधा झाल्याने आणि कुटुंबांची कुटुंब उद्ध्वस्त झाली होती. अनेक लोकांची घरी सुद्धा वाहून गेली होती. यावरती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला आदेश देऊन येथील धरणग्रस्त तिवरेवासियांना घरे बांधून देण्यास सांगितले होते. त्याचा पाठपुरावा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज चिपळूण येथील शासकीय विश्रामगृह येथे त्या संदर्भात बैठक आयोजन केली होती. या बैठकीला सिडकोचे अधिकारी,बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते. यावेळेस तिवरे धरणग्रस्त वासियांची चर्चा करून त्यांना लवकर घर बांधून दिले जाणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. तिवरे धरण वासी यांनी याचे स्वागत करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि सिडको यांचे मनापासून आभार मानले. या बैठकीला चिपळूणचे आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख शशिकांत चाळके उपस्थित होते.