नागरिक धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:32 AM2021-04-22T04:32:19+5:302021-04-22T04:32:19+5:30
साखरपा : नजीकच्या दख्खन भागात ४६ रुग्ण कोरोनाबाधित आढळल्याने सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धसका नागरिकांनी घेतला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या ...
साखरपा : नजीकच्या दख्खन भागात ४६ रुग्ण कोरोनाबाधित आढळल्याने सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धसका नागरिकांनी घेतला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरू लागला आहे. या संसर्गाचा वेग अधिक असल्याने ज्या भागात रुग्ण सापडू लागले आहेत, तिथल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
टॅंकरची मागणी
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील पाणीटंचाई अधिकाधिक वाढू लागली आहे. सध्या तालुक्यातील ५ गावे आणि ८ वाड्यांनी टॅंकरची मागणी केली आहे. यात बेलारी माचीवाडी, कुटगिरी, राजीवली, पाचांबे, पूर्य तर्फ देवळे व पाचांबे खालचीवाडी आदी गावांचा व वाडींचा समावेश आहे.
चक्रीवादळाने नुकसान
आवाशी : खेड तालुक्यातील कांदोशी धनगरवाडी येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळात कांदोशी येथील कोंडीराम अर्जुन बर्गे व अन्य ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान झाले आहे. अनेक गरीब कुटुंबांना आता मोडक्या छपराखाली राहावे लागत आहे. त्यामुळे या लोकांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
कोविड सेंटरमध्ये बिस्किटे वाटप
देवरुख : नजीकच्या साडवली येथील कोविड सेंटरसाठी शहरातील व्यापारी कांता पोकळे यांनी बिस्किट पुडे, तर मनसेचे सागर संसारे, ऋतुराज देवरूखकर, तसेच निलेश चव्हाण यांनी रुग्णांसाठी अंडी भेट दिली. लाॅकडाऊन काळात अनेक संस्था, संघटना, व्यापारी आदींनी सामाजिक बांधिलकी जपून मदतीचा हात दिला आहे.
न्यायालयीन वेळेत कपात
रत्नागिरी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील न्यायालयांच्या कामकाजाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. दिवसातील केवळ अडीच तासच न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. या काळात महत्त्वाची प्रकरणेच हाताळण्यात येणार आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायालयाची वेळ कमी करण्यात आली आहे.