शहर सौंदर्यकरण स्पर्धेत देवरुख नगरपंचायत राज्यात दुसरी, सन्मानपत्र अन् दहा कोटींचे बक्षीस

By मनोज मुळ्ये | Published: April 20, 2023 05:17 PM2023-04-20T17:17:07+5:302023-04-20T17:54:45+5:30

नगरपंचायतीने राबवलेल्या उपक्रमाचे पुरस्काराच्या माध्यमातून फळ मिळाले

City beautification competition Devrukh Nagar Panchayat 2nd in the state, certificate and prize of ten crores | शहर सौंदर्यकरण स्पर्धेत देवरुख नगरपंचायत राज्यात दुसरी, सन्मानपत्र अन् दहा कोटींचे बक्षीस

शहर सौंदर्यकरण स्पर्धेत देवरुख नगरपंचायत राज्यात दुसरी, सन्मानपत्र अन् दहा कोटींचे बक्षीस

googlenewsNext

सचिन मोहिते

देवरुख : मुंबई येथे गुरुवारी नगर विकास दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहर सौदर्यकरण स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यामधे नगरपंचायत विभागात देवरुख नगरपंचायतीला राज्यात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

सन्मानचिन्ह आणि दहा कोटी रुपये असे या बक्षिसाचे स्वरुप आहे. देवरुख नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, मुख्याधिकारी चेतन विसपुते, उपनगराध्य वैभव कदम, नगर सेवक संतोष केदारी, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये यानी हा पुरस्कार स्वीकारला.

हा पुरस्कार मिळाल्यामुळे देवरुख नगरपंचायतीच्या प्रशासनासह अधिकारी वर्गाचे अभिनंदन होत आहे. देवरुख नगरपंचायतीने राबवलेल्या उपक्रमाचे पुरस्काराच्या माध्यमातून फळ मिळाले आहे.

देवरुख नगरपंचायतीने शहर सौंदर्यकरण व सुशोभीकरण यावर भर देत दिशादर्शक बोर्ड आकर्षक पद्धतीने लावले आहेत. चौकाचौकांना दिलेली नावे देखील सुयोग्य पद्धतीने देण्यात आली आहेत. इतर शहरांच्या तुलनेत देवरुख शहर स्वच्छतेमध्ये अग्रणी राहिले आहे. नागरिकांना दररोज कचरा उचलण्याकरिता शहरातून घंटागाडी फिरवत नगरपालिका कडून स्वच्छतेसंदर्भात सेवा चांगली मिळत आहे. वाडीमध्ये पथदीप, घनकचरा प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. शहरातल्या सर्वच भिंतीवर स्वच्छतेविषयी जनजागृती करणारे स्लोगन स्वच्छतेचा संदेश देणारी चित्रे रेखाटली आहेत

Web Title: City beautification competition Devrukh Nagar Panchayat 2nd in the state, certificate and prize of ten crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.